Join us

कपाट उघडताच कपड्यांना कुबट वास येतो, पावसाळ्यातला भन्नाट उपाय-खर्च फक्त १० रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 19:30 IST

Home Hacks: पावसाळ्यात घरात कपडे वाळत घातले तरी त्यांमधून वास येऊ लागतो. अशात हे सोपे उपाय कामात येतात.

Home Hacks: पावसाळा आपल्यासोबत केवळ रिमझिम पाऊस नाही तर काही समस्याही घेऊन येत असतो. सगळीकडे चिखल, ओलावा असतो. सोबतच घराच्या भिंतींवरही ओलसरपणा येतो. त्याशिवाय ओलसरपणामुळे कपाटात ठेवलेले कपडेही ओलसर होतात. पावसाळ्यात फारसं उन्ह नसल्यानं कपडे घरात व्यवस्थित सुकतही नाहीत. घरात कपडे वाळत घातले तरी त्यांमधून वास येऊ लागतो. आपल्याला सुद्धा अशा समस्येचा सामना करावा लागत असेल तर काही सोप्या टिप्स आपल्या कामात येऊ शकतात.

कापराच्या वड्या

कपड्यांमधील ओलसरपणा दूर करण्यासाठी आपण पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या कापराच्या वड्यांचाही वापर करू शकता. कपाटातील ओलसरपणा आणि कपड्यांचा वास दूर करण्यासाठी कापराच्या वड्या कपड्यांच्या मधे ठेवा. या वड्यांनी ओलसरपणा तर कमी होतोच, सोबतच कपड्यांवर कीटकही येत नाहीत.

बेकिंग सोडा

ज्यावेळी आपण कपडे धुतो त्यावेळी डिटर्जंटसोबत बेकिंग सोडाही कपडे धुण्याच्या पाण्यात टाका. असं केल्यानं कपडे चांगले स्वच्छ होतात, सोबतच कपड्यांमधून येणारा वासही दूर होतो.

कपाटात ठेवा कॉफी

कपाटात ठेवलेल्या कपड्यांचा ओलसरपणा कमी करण्यासाठी कॉफी पावडर कपाटात ठेवू शकता. एखाद्या मोठ्या वाटीमध्ये कॉफी पावडर कपाटाच्या आतील एखाद्या कोपऱ्यात ठेवा. यानं कपड्यांमधून वासही येणार नाही.

ओलसरपणा दूर करतं मीठ

पावसामुळे भिंतीवर ओल आली असेल तर एखाद्या मोठ्या तोंडाच्या भांड्यात मीठ टाका आणि भांड ओल आलेल्या ठिकाणी ठेवा. कपाटात आलेला ओलसरपणा मिठानं कमी होतो.

टॅग्स :सोशल व्हायरलहोम रेमेडीमोसमी पाऊस