Join us

Viral Video : सर्व पुरुष सारखे नसतात!! बाळाला दूध पाजणाऱ्या महिलेला पाहून कॅब ड्रायव्हरनं 'असं' काही केलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 16:45 IST

Viral Video Of Cab Driver Heartwarming Gesture : मला बाळाला दूध पाजवायचं होतं. माझ्याकडे झाकण्यासाठी कापड किंवा स्कार्फ नव्हता मला असुरक्षित वाटत होतं. मी कसतरी बाळाला झाकलं

अनेक महिला कॅबमध्ये प्रवास करताना स्वत:ला असुरक्षित समजतात (Cab Driver Heartwarming Gesture To Mother). खासकरून जेव्हा लहान बाळांसोबत प्रवास करतात तेव्हा. कारण सर्वांसमोर स्तनपान करणं महिलांना असुरक्षित वाटतं. अशातच एका महिलने कॅब ड्रायव्हरसोबतचा आपला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ मनाला स्पर्श करणारा आहे. व्हिडिओ पाहून तुम्हाला असं वाटेल की सर्व माणसं सारखी नसतात. (Cab Driver Heartwarming Gesture To Mother Who Was Feeding Her Baby In car Wins Internet)

अलिकडेच महिलेनं एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओवरून सोशल मीडियावर बऱ्याच कमेंट्स येत आहेत. आपले छोटे छोटे अनुभव या महिलेनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. महिलेनं सांगितलं की जेव्हा ती तिच्या बाळाला दूध पाजवत होती तेव्हा कॅब ड्रायव्हरनं शांतपणे काहीही न बोलताना त्याचा रिअर व्यू मिमर म्हणजेच मागचं सीट दिसतं तो आरसा त्यानं एडजस्ट केला.

ज्यामुळे मागच्या सीटवर काय होत आहे जे त्याला दिसणार नाही. त्याच्या या छोट्या कृतीमुळे महिलेला खूपच सुरक्षित वाटले. या घटनेवरून लक्षात येतं की दयाळूपणा आणि माणूसकी व्यक्तीच्या लहान कृतींमध्येच दडलेली असते. यशिका रापरिया नावाची महिला आपल्या बाळासोबत प्रवास करत होती. इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी यात अधिक माहिती दिली आहे.

याला म्हणतात जेंटलमॅन

त्यांनी लिहिले की मी कॅबने प्रवास करत होती आणि मला बाळाला दूध पाजवायचं होतं. माझ्याकडे झाकण्यासाठी कापड किंवा स्कार्फ नव्हता मला असुरक्षित वाटत होतं. मी कसतरी बाळाला झाकलं आणि बाळाला दूध पाजवायला लागले. मी वर पाहिले तर एक सुंदर गोष्ट जाणवली ती म्हणजे कार ड्रायव्हरनं आपला आरसा अशा पद्धतीनं वळवला होता की त्याला मागे काय सुरू आहे ते काहीच दिसणार नाही. त्याच्या छोट्याश्या कृतीमुळे मला सन्मान मिळाला आणि सुरक्षित वाटले. यावरून दिसून येतं की ती व्यक्ती किती समजदार आहे.

व्हिडिओत कार ड्रायव्हरचा चेहरा दिसत नाही फक्त गाडी चालवताना दिसून येत आहे. त्याच्या या छोट्याश्या कृतीनं अनेकाचं मन जिंकलं आहे. या पोस्टवर लोकांनी अनेक रिएक्शन्स दिले आहेत. एका युजरनं लिहिलं की या घटनेवरून माणुसकीवरचा विश्वास वाढला आहे

टॅग्स :सोशल व्हायरलव्हायरल व्हिडिओ