Join us

भर लग्नात दम मारो दम! चारचौघात भर मांडवात असं कुणी वागतं का? पाहा व्हायरल व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2022 15:27 IST

Social Viral हटके काहीतरी करायचं म्हणून लोक काय काय करतील, याचाच हा एक नमूना.

मांडवात हटके गोष्टी करून व्हायरल होण्याचा जणू सध्या वधू वरांचा ट्रेण्ड सुरू झाला आहे. काही वधू वर डान्स करून व्हायरल होतात. तर, काही आपल्या फॅशन कपड्यांमुळे चर्चेत येतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झालाय. ज्यात वधूने हुक्का पित वराचे चुंबन घेतले आहे. हा व्हिडिओ पाहून उपस्थितांना आश्चर्याचा धक्का तर बसला आहेच. मात्र, व्हिडिओ पाहणारे लोकही हैराण झाले आहेत.

लग्नात एकमेकांचे चुंबन घेणे हे विदेशी पद्धत आहे. मात्र, सध्या हा ट्रेण्ड भारतात देखील पाहायला मिळत आहे. आपण व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की, स्टेजवर वधू-वर उभे आहेत आणि त्यांच्यासमोर एक हुक्काही ठेवण्यात आला आहे, ज्याचा पाइप नवरीच्या हातात आहे.हुक्का पिताना नवरी तोंडात खूप धूर घेते आणि मग तो धूर नवरदेवाच्या तोंडात किस करताना सोडते. आणि नवरदेव देखील तिने दिलेला धूर बाहेर सोडतो. हे दृश्य पाहून साहजिकच लग्नसमारंभात आलेल्या पाहुण्यांना धक्का बसला असणारच.हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर laiba._waseem नावाच्या आयडीने शेअर करण्यात आला आहे.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया