Join us

हॉट MMS लिक झाल्याने भयंकर ट्रोल झालेली शिल्पी राज नेमकी आहे कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2022 14:17 IST

Bhojpuri singer Shilpi Raj: भोजपुरी सिंगर शिल्पी राज सध्या सोशल मिडियावर चांगलीच चर्चेत आहे. नेमकी कोण ही शिल्पी राज आणि एवढी का बरं तिची चर्चा?

ठळक मुद्देशिल्पी सोशल मिडियावर एवढी जास्त ट्रोल झाली की, ज्यांना ती आजवर माहिती नव्हती त्यांनाही तिच्याबाबत उत्सूकता वाटू लागली.

भोजपुरी सिनेमातली बऱ्यापैकी प्रसिद्ध गायिका म्हणजे शिल्पी राज (Shilpi Raj). सध्या शिल्पी सोशल मिडियावर खूपच जास्त चर्चेत आहे. तिची एवढी चर्चा होण्याचं कारण म्हणजे नुकताच लीक झालेला तिचा एक MMS. या व्हायरल व्हिडिओमध्ये शिल्पी आणि तिचा बॉयफ्रेंड अतिशय इंटीमेट सीनमध्ये दिसत आहेत. त्यामुळे सोशल मिडियावर हा व्हिडिओ झपाट्याने व्हायरल (viral MMS) झाला आणि त्यामुळे शिल्पीचं चांगलंच धाबं दणाणलं. या MMS प्रकरणामुळे शिल्पी जबरदस्त ट्रोल झाली असून सोशल मिडियावर सध्या तिच्या या प्रकरणाची चांगलीच चर्चा सुरु आहे.

 

ही शिल्पी नेमकी कोण, असाही प्रश्न काही जणांना पडला आहे. त्यामुळेच तर वाचा हे शिल्पी प्रकरण नेमकं आहे तरी काय ... उत्तर प्रदेशातल्या एका गरीब कुटूंबात जन्मलेली शिल्पी गाण्यात मात्र लहानपणापासूनच तरबेज होती. त्यामुळे अगदी शाळेपासूनच तिने गाण्याच्या स्पर्धा गाजवायला सुरुवात केली होती. गाण्यात तिला असलेली जबरदस्त गती पाहून आणि गाण्यातच करिअर करायचं, हे निश्चित असल्याने ती बारावीनंतर पटना येथे गेली आणि तिथे तिने गाण्याचे शिक्षण सुरू केले. 

 

२०१७ साली शिल्पीला पहिला ब्रेक मिळाला आणि तिचे भोजपुरी गाण्यातले करिअर सुरू झाले. तिचे “भुकुर भुकुर लाइट बारेम करेजऊ” हे पहिलेच गाणे तुफान चालले आणि लोकांनी शिल्पीला अक्षरश: डोक्यावर घेतले. यानंतर एका पेक्षा एक हिट देणारी शिल्पी खूपच कमी कालावधीत भोजपुरी स्टार सिंगर म्हणून ओळखली जाऊ लागली. भोजपुरी स्टार पवन सिंह, खेसारी लाल यादव, अरविंद अकेला, प्रमोद प्रेमी या भोजपुरी स्टारसोबतही तिने काम केले आहे. सोशल मिडियावरही तिचे हजारो चाहते असून ती कायमच तिच्या गाण्यांमुळे चर्चेत राहिली आहे.

 

काही दिवसांपुर्वी मात्र शिल्पीचा एक भलताच व्हिडिओ लीक झाला. या व्हिडिओमध्ये ती आणि तिचा बॉयफ्रेंड एकमेकांसोबत नको त्या अवस्थेत होते. यामुळे शिल्पी सोशल मिडियावर एवढी जास्त ट्रोल झाली की, ज्यांना ती आजवर माहिती नव्हती त्यांनाही तिच्याबाबत उत्सूकता वाटू लागली. व्हिडिओ लीक झाल्यानंतर शिल्पीने तिचा हा व्हिडिओ रिशेअर करू नये, असे भावनिक आवाहनही तिच्या चाहत्यांना केले होते. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलव्हायरल फोटोज्सोशल मीडिया