lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > अरे हे काय खाताय? ट्विटरवर रंगली ‘भेंडी नुडल्स’ची चर्चा, लोक म्हणाले बिचारी भेंडी

अरे हे काय खाताय? ट्विटरवर रंगली ‘भेंडी नुडल्स’ची चर्चा, लोक म्हणाले बिचारी भेंडी

‘Bhindi in noodles’: Woman shares photo of meal from a restaurant in Myanmar आजकल लोकं कोणत्या पदार्थात काय मिसळून खातील याचा काय नेम नाही..त्याचंच हे एक रुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2023 05:23 PM2023-04-06T17:23:39+5:302023-04-06T17:24:21+5:30

‘Bhindi in noodles’: Woman shares photo of meal from a restaurant in Myanmar आजकल लोकं कोणत्या पदार्थात काय मिसळून खातील याचा काय नेम नाही..त्याचंच हे एक रुप

‘Bhindi in noodles’: Woman shares photo of meal from a restaurant in Myanmar | अरे हे काय खाताय? ट्विटरवर रंगली ‘भेंडी नुडल्स’ची चर्चा, लोक म्हणाले बिचारी भेंडी

अरे हे काय खाताय? ट्विटरवर रंगली ‘भेंडी नुडल्स’ची चर्चा, लोक म्हणाले बिचारी भेंडी

प्रत्येक देशाची खाद्यसंस्कृती वेगळी असते. आपल्या भारतातच बघा ना, उत्तर ते दक्षिण भागातल्या खाद्यसंस्कृतीत किती वैविध्यता आहे. पण सध्या भारतातील याच पदार्थात प्रयोग करून, नवीन पदार्थ बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्ट्रीट फूड विक्रेते देखील ग्राहकांचे लक्ष वेधण्यासाठी, पदार्थात विविध गोष्टी मिसळून, नवीन डिश बनवतात. काही पदार्थ उत्तम लागतात, तर काही फसतात. हे अतरंगी पदार्थ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होतात.

असाच एक पदार्थ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. ज्यात नुडल्समध्ये चक्क भेंडी मिक्स करण्यात आली आहे. नुडल्समध्ये भाज्यांचा वापर हा होतोच. पण भेंडी ही भाजी कधी नुडल्समध्ये मिक्स करून खाल्ली आहे का?(‘Bhindi in noodles’: Woman shares photo of meal from a restaurant in Myanmar).

भेंडी नुडल्स

भेंडी नुडल्सच्या आधी 'ब्लॅक नूडल्स' बद्दल बरीच चर्चा झाली होती. पण आता भेंडी नुडल्स या पदार्थाचा फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. या पदार्थाचा फोटो एका महिलेने ट्वीटरवर पोस्ट केला आहे. ही डिश म्यानमारच्या यंगूनमधील एका रेस्टॉरंटमध्ये तयार करण्यात आली आहे. फोटो शेअर करताना महिलेने कॅप्शनमध्ये लिहिले, ''म्यानमारमधील यंगूनमध्ये खा भेंडी नूडल्स.'' या फोटोत नुडल्ससोबत कोथिंबीर, बेबी कॉर्न, शेंगदाणे आणि मसालेही दिसत आहे. या डिशचा मुख्य पात्र म्हणजेच भेंडीचे काप ठळक दिसत आहे.

काकूंचा गारेगार देसी जुगाड फ्रिज नाही तर फॅन लावून केली कुल्फी, आनंद महिंद्रांनी शेअर केला व्हिडिओ

अतरंगी नुडल्सची चर्चा देशभर

म्यानमारमध्ये नूडल्स खूप प्रसिद्ध आहेत. तेथे राहणारे लोकं अनेक प्रकारच्या भाज्या त्यात मिसळून खातात. दुसरीकडे, भारतात नूडल्समध्ये कोबी, गाजर, सिमला मिरची आणि कांदा घालून बनवले जाते. ज्यामुळे भेंडी नूडल्स पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.

पठ्ठ्याने वर्षभरात फस्त केली ६ लाख रुपयांची इडली, हा ‘इडली दिवाना’ नक्की आहे कुठला?

सोशल मिडीयावर कमेंट्सचा पाऊस

भेंडी नुडल्स या पदार्थाचा फोटो व्हायरल होताच, या पोस्टवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव झाला आहे. एका नेटकऱ्याने, ''वाटलं नव्हतं की भेंडी अशी कधी पाहावी लागेल.', तर दुसऱ्या एका युजरने ''भेंडी नुडल्ससोबत शिजवतात की वेगवेगळे शिजवतात?''. सध्या या अतरंगी डिशवर अतरंगी कमेंट्सचा पाऊस नेटकरी करीत आहे.

Web Title: ‘Bhindi in noodles’: Woman shares photo of meal from a restaurant in Myanmar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.