सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. पावसाळा म्हटलं की आजूबाजूचा निसर्ग हिरवागार होतो. वातावरणात गारवा जाणवू लागतो परंतु पावसाळा येतानाच आपल्यासोबत अनेक (Best Ways to Get Rid of Mosquitoes in Monsoon Season) समस्या घेऊन येतो. पावसाळ्यात घरभर फिरणाऱ्या माशा, डास, मच्छर, कीटक, चिलटं यामुळे नको जीव होतो. सतत चावणारे डास, डोळ्यांपुढे घोंघावणारी चिलटं आणि घराच्या कानाकोपऱ्यांत लपून (Common kitchen ingredients can keep monsoon insects and crawlers at bay) बसणारे कीटक यामुळे आपल्यापैकी बरेचजण (Say Goodbye to Mosquitoes This Monsoon with These Natural Remedies That Cost Less Than ₹10) हैराण होतात. पावसाळ्यात घरी माश्या, डास, चिलटं यांचे प्रमाण वाढल्यामुळे रोगराई देखील पसरते. यावर उपाय म्हणून आपण वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्सयुक्त स्प्रे, औषध यांचा हमखास वापर करतो(Natural Ways to Keep Mosquitoes Away In Monsoon).
घरातील माशा, डास, मच्छर, कीटक, चिलटं पळवून लावण्यासाठी हे केमिकल्सयुक्त स्प्रे, औषधांचे उपाय सोपे असले तरी त्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. याठीच, घरात स्वच्छता राखणे आणि काही घरगुती उपायांचा वापर करणे आवश्यक असते. जर आपल्याला बाजारात मिळणाऱ्या केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर करायचा नसेल तर, एक सोपा घरगुती उपाय आपण नक्की ट्राय करु शकता. घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्याचा वापर करून अगदी सहजपणे, पावसाळ्यात घरभर फिरणाऱ्या माशा, डास, मच्छर, कीटक, चिलटं यांना पळवून लावू शकतो.
साहित्य :-
१. लसणाच्या पाकळ्यांची सालं - २ कप
२. लवंग - १० ते १२ लवंग काड्या
३. कापूर - ६ ते ७ कापूर वड्या
४. अगरबत्ती - १ काडी
५. सुकलेली कडीपत्त्याची पाने - १ कप
६. लिंबाची सालं - १ ते २ लिंबाच्या साली
७. मोहरीचे तेल - १ टेबलस्पून
८. फुलवात - १ ते २ वाती
घरभर उंदरांचा उच्छाद? करा कणकेच्या पिठाचा सोपा घरगुती उपाय - उंदीर पळतील घराबाहेर...
पावसाळ्यात छत गळते, भिंतीना ओल- बुरशी येते? पावसापूर्वी करा ४ सोपे उपाय, त्रास होईल कमी...
कृती :-
१. सगळ्यातआधी एका मिक्सरच्या भांड्यात लसणाच्या पाकळ्यांची सालं, लवंग, कापूर वड्या, अगरबत्तीची काडी, सुकलेली कडीपत्त्याची पाने असे सगळे घटक एकत्रित करून घालावेत.
२. आता मिक्सरमध्ये हे सगळे जिन्नस एकत्रित फिरवून त्याची बारीक पूड तयार करून घ्यावी.
घराच्या कानाकोपऱ्यातील झुरळांमुळे हैराण? करा १ घरगुती उपाय, झुरळं घरात फिरकणार देखील नाहीत...
३. एक छोटा मातीचा दिवा किंवा वाटी घ्यावी या वाटीत लिंबाचा रस काढून शिल्लक राहिलेली सालं ठेवून त्या सालीत मिक्सरमधील बारीक पूड भरुन घ्यावी.
४. त्यानंतर या लिंबाच्या सालीत एक फुलवात ठेवून दिव्याप्रमाणे तयार करून घ्यावे. मग यात चमचाभर मोहरीचे तेल घालून फुलवात पेटवून दिवा लावावा.
घरातील कानाकोपऱ्यांत किंवा ज्या भागात जास्त डास, माशा, चिलटं, कीटक दिसतात, त्या ठिकाणी हा दिवा पेटवून ठेवून द्यावा. यामुळे घरात डास, माशा, चिलटं, कीटक पुन्हा फिरकणार देखील नाही. यात असणाऱ्या लसणाच्या पाकळ्यांची सालं, लवंग, कापूर वड्या यांच्या उग्र गंधामुळे माशा, चिलटं, कीटक दूर पळतात.