उन्हाळ्यात पालींची संख्या खूप वाढते. त्यामुळे घरात जवळपास प्रत्येक खोलीतच पालीची पिल्लं इकडून तिकडे पळताना दिसतात. भिंतीवर सतत एखादी मोठी पाल आणि तिची पिल्लं दिसली की अनेकींची घाबरगुंडी उडते, तो भाग वेगळाच.. शिवाय पालींमुळे वेगवेगळे रोग होण्याचा धोकाही असतोच..त्यामुळेच घरातल्या पालींना पळवून लावणे गरजेचेच आहे (Simple Tips And Tricks To Get Rid Of Lizards or Chipkali). त्यासाठी नेमका कोणता घरगुती उपाय करता येऊ शकतो, ते पाहूया..(Best Home Remedy To Get Rid of Lizards or Chipkali)
पालींना पळवून लावण्यासाठी कोणता घरगुती उपाय करावा?
पालींचा कायमचा बंदोबस्त करण्याचा एक खास उपाय vedantsir या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला असून यामध्ये दोन पदार्थांचा वापर करायला सांगितला आहे.
व्यायामासाठी वेळ नाही? मलायका अरोरा म्हणते फक्त २ मिनीट व्यायाम करा- वजन, पोट उतरेल भराभर
त्यापैकी पहिला पदार्थ आहे कॉफी पावडर आणि दुसरा पदार्थ आहे तंबाखू. कॉफी आणि तंबाखू हे दोन्ही पदार्थ समप्रमाणात घेऊन एकत्र करा. त्यानंतर थोडंसं पाणी लावून त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या तयार करा आणि जिथे पाली येतात अशा ठिकाणी हे गोळे ठेवून द्या..कॉफीमध्ये असणारं कॅफिन आणि तंबाखूमध्ये असणारं निकोटीन या दोन्हींच्या उग्र वासामुळे पाली त्या ठिकाणी पुन्हा फिरकत नाहीत.
हा उपायही करू शकता
हा उपाय तुम्ही थोडा वेगळ्या पद्धतीनेही करू शकता. यासाठी एक ग्लास पाणी घ्या. त्यामध्ये १ ते दिड चमचा कॉफी पावडर आणि तेवढीच तंबाखू घाला. साधारण ८ ते १० तास हे पाणी झाकून ठेवा.
पावसाळा सुरू होण्याआधीच रोपांसाठी करून ठेवा 'हे' घरगुती खत, बाग वर्षभर हिरवीगार- फुललेली राहील
त्यानंतर गाळून घेऊन एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. पाल दिसल्यावर तिच्या आजुबाजुला हा स्प्रे शिंपडा किंवा मग जिथे तुम्हाला नेहमीच पाली दिसतात त्या ठिकाणी हा स्प्रे मारा. उग्र वासामुळे पाली पळून जातील आणि त्याठिकाणी पुन्हा फिरकणार नाहीत.