Join us
Daily Top 2Weekly Top 5

मित्र झाले उदार, मोठ्या मनानं जोडप्याला लग्नात दिलं सध्याचं सर्वात महागडं गिफ्ट! नवरा-नवरी आनंदाने...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2022 13:52 IST

नव्या आयुष्याला सुरुवात करताना शुभेच्छा म्हणून दिले जाणारे हे गिफ्ट काहीतरी खास असावे असे आपल्याला कायम वाटते. असाच विचार करुन हे खास गिफ्ट देण्यात आले.

ठळक मुद्देमित्रमंडळी आपल्यासाठी काय करतील याचा नेम नाही....तमिळनाडूतील मित्रांनी आपल्या मित्राच्या लग्नात दिले खास गिफ्ट

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे दुध, भाजीपाला आणि अत्यावश्यक वस्तूंच्या किंमतीतही मोठ्या प्रमाणात वाझ होताना दिसत आहे. आता कुठे कोरोनाचे संकट दूर होऊन सामान्यांचे जनजीवन सुरळीत होत असताना पेट्रोल, डिझेलच्या सातत्याने वाढत असलेल्या किंमती सगळ्यांसाठीच खिशाला कात्री लावणाऱ्या ठरत आहेत. हीच गोष्ट लक्षात घेऊन एका जोडप्याला लग्नाचे गिफ्ट म्हणून त्यांच्या मित्रमंडळींनी चक्क पेट्रोल आणि डिझेल गिफ्ट केले आहे. बरेचदा मित्रमंडळी आपल्या मित्रांच्या लग्नात काही ना काही अनोखे गिफ्ट देत असल्याचे फोटो आणि व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. 

(Image : Google)

ही गोष्ट तमिळनाडूतील असून ग्रेस कुमार आणि किर्तना यांनी नुकतीच लग्नगाठ बांधली. लग्नाला जाताना आपण नेहमीच काही ना काही गिफ्ट देत असतो. आपल्या शुभेच्छांबरोबरच हे गिफ्ट त्या जोडप्यासाठी कायम आठवण म्हणून त्यांच्या सोबत राहावे असा आपला त्यामागील उद्देश असतो. यामध्ये कपड्यांपासून वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंचा समावेश असतो. नव्या आयुष्याला सुरुवात करताना शुभेच्छा म्हणून दिले जाणारे हे गिफ्ट काहीतरी खास असावे असे आपल्याला कायम वाटते. असाच विचार करुन या मित्रमंडळींनी आपल्या मित्राला नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी १ लीटर पेट्रोल आणि १ लीटर डिझेल दिले आहे. 

सुरुवातीला हे अनोखे गिफ्ट पाहून या नवदाम्पत्याला काहीसे आश्चर्य वाटले. पण नंतर त्यांनीही आपल्या मित्रांनी प्रेमाने दिलेले हे महागडे गिफ्ट स्वीकारले. या नवरा-नवरीचा पेट्रोल आणि डिझेलचे गिफ्ट स्वीकारतानाचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. पुण्या-मुंबईसारख्या शहरांमध्ये पेट्रोलची किंमत १२० रुपयांवर गेली असून डिझेलची किंमत १०३ रुपयांपर्यंत कडाडली आहे. त्यामुळे या जोडप्याला आयुष्याच्या नवीन प्रवासाला सुरुवात करताना मिळालेले हे गिफ्ट अतिशय उपयुक्त ठरणारे असेच आहे असे म्हटले जात आहे. 

टॅग्स :सोशल व्हायरललग्नगिफ्ट आयडियातामिळनाडू