Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > चिमुकल्या राहाचं नेटीझन्सनी केलं भरभरून कौतुक, महिला दिनी आई आलिया भटला दिलं 'हे' खास गिफ्ट...

चिमुकल्या राहाचं नेटीझन्सनी केलं भरभरून कौतुक, महिला दिनी आई आलिया भटला दिलं 'हे' खास गिफ्ट...

International Women's Day: अभिनेत्री आलिया भटचा महिला दिन खूप स्पेशल झाला असणार... कारण या दिवशी तिला तिच्या लेकीने खूपच वेगळं गिफ्ट दिलं आहे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2026 16:30 IST2026-03-09T16:30:07+5:302026-03-09T16:30:45+5:30

International Women's Day: अभिनेत्री आलिया भटचा महिला दिन खूप स्पेशल झाला असणार... कारण या दिवशी तिला तिच्या लेकीने खूपच वेगळं गिफ्ट दिलं आहे..

beautiful gift to Alia Bhatt by daughter Raha Kapoor on International Women's Day | चिमुकल्या राहाचं नेटीझन्सनी केलं भरभरून कौतुक, महिला दिनी आई आलिया भटला दिलं 'हे' खास गिफ्ट...

चिमुकल्या राहाचं नेटीझन्सनी केलं भरभरून कौतुक, महिला दिनी आई आलिया भटला दिलं 'हे' खास गिफ्ट...

Highlightsया ३ गोष्टी जमल्या तर नक्कीच महिला दिनाचा उद्देश सफल होऊ शकतो, असं वाटतं.. नाही का?

महिला दिन सगळीकडेच अतिशय उत्साहात, आनंदात साजरा झाला. यानिमित्ताने वेगवेगळ्या संस्था महिलांसाठी विशेष कार्यक्रम घेतच असतात. त्यामध्ये कर्तृत्ववान महिलांनी केलेल्या कार्याचा सन्मान होत असतो. महिलांसाठी ती एक अतिशय प्रोत्साहनपर गोष्ट असते... याशिवाय काही घरांमध्येही कुटूंबातले सगळे एकत्र येऊन घरातल्या महिलांसाठी काहीतरी खास करतात.. बाहेर कितीही सत्कार झाले, कामाचं कौतुक झालं तरी जेव्हा घरातल्या मंडळींकडून त्याची दखल घेतली जाते, तेव्हाच त्या महिलांचा आनंद, उत्साह वाढतो. आपण खरंच काहीतरी चांगलं करतो आहोत, याचं समाधान त्यांना मिळतं. कारण आपल्या घरच्या, आपल्या हक्काच्या मायेच्या माणसांची दादच त्या स्त्रीसाठी खूप महत्त्वाची असते. अभिनेत्री आलिया भटही याला अपवाद नाही. म्हणूनच तर या दिवशी तिच्या लेकीनं तिला जे काही दिलं ते सूख तिला सोशल मीडियाद्वारे सगळ्यांसोबत शेअर करावं वाटलं...(beautiful gift to Alia Bhatt by daughter Raha Kapoor on International Women's Day)

 

आलिया भटने इंस्टाग्रामवर नुकतीच एक स्टोरी पोस्ट केली आहे. यामध्ये तिच्या लेकीने म्हणजेच राहा कपूरने तिच्यासाठी स्वत:च्या हाताने तयार केलेलं एक सुंदर ग्रिटिंग कार्ड आहे. आता राहा अवघी साडेतीन वर्षांची असेल..

रोजचे कपडे धुताना डिटर्जंटमध्ये 'हा' पदार्थ मिसळा, जुने कपडेही चमकतील नव्यासारखे..

पण तिने तिच्या बाबांची म्हणजेच रणबीर कपूरची मदत घेऊन तिच्या आईसाठी अतिशय देखणं ग्रिटिंग कार्ड तयार केलं. "Happy Women's Day" असा एवढाच संदेश त्यावर लिहिला आहे. पण स्वत:च्या हाताने कोणीतरी काहीतरी करून दिल्याचा आनंद काही वेगळाच असतो.. आलियाने या ग्रिटिंग कार्ड सोबतच एक खास मेसेजही शेअर केला आहे...

 

आलिया या मेसेजमध्ये म्हणते की महिला दिनाच्या औचित्याने आपण आपल्या मुलींना एकच खूप खूप महत्त्वाची आणि अतिशय सुंदर अशी गोष्ट शिकवू शकतो आणि ती म्हणजे स्वत:वर विश्वास ठेवा, स्वत:ला ओळखा आणि स्वत:वर भरभरून प्रेम करा... महिला दिन यासाठीच तर आहे ना..

'या' पिठाच्या पोळ्या खा, वजन राहील कंट्रोलमध्ये- केस दाट आणि त्वचाही होईल सुंदर...

अनेक महिलांना स्वत:च्या कर्तृत्वावर विश्वास नाही. स्वत:च्या शक्ती त्यांना माहिती नाहीत आणि स्वत:वर प्रेम करून मनासारखं जगणं हे तर कित्येकींचा गावीही नाही. या ३ गोष्टी जमल्या तर नक्कीच महिला दिनाचा उद्देश सफल होऊ शकतो, असं वाटतं.. नाही का?
 

Web Title : आलिया भट्ट को राहा का प्यारा महिला दिवस उपहार, नेटिज़न्स ने की प्रशंसा

Web Summary : महिला दिवस पर, आलिया भट्ट ने अपनी बेटी राहा से मिला एक प्यारा उपहार साझा किया: एक हस्तनिर्मित कार्ड। आलिया ने बेटियों को आत्मविश्वास और प्यार सिखाने पर जोर दिया, जो महिला सशक्तिकरण के लिए जरूरी है। कई लोगों में आत्मविश्वास और आत्म-प्रेम की कमी होती है, जिससे उनकी क्षमता बाधित होती है। इन गुणों को बढ़ावा देना महिला दिवस के सही उद्देश्य को पूरा करता है।

Web Title : Raha's heartwarming Women's Day gift to Alia Bhatt praised by netizens.

Web Summary : On Women's Day, Alia Bhatt shared a heartfelt gift from her daughter Raha: a handmade card. Alia emphasized teaching daughters self-belief and love, essential for women's empowerment. Many lack confidence and self-love, hindering their potential. Nurturing these qualities fulfills Women's Day's true purpose.