Join us

सुंदरा मनामध्ये भरली ! वानराच्या पिल्लाने तरुणी सोबत केले असे काही.. पाहा व्हायरल व्हिडिओ..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2022 16:07 IST

Social Viral Video वानराचं लहान पिल्लू आलं तरुणी जवळ, छोट्या छोट्या हातांनी धरले गाल आणि... पाहा वानराचे प्रताप

लहान मुलं ही देवा घरची फुलं असतात असं आपण अनेकदा ऐकलंच असेल. लहान मुलांची तल्लख बुद्धी यासह सोज्वळ हृदय अनेकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरतात. मानवी मुलासह प्राण्यांचे पिल्ले देखील अगदीच सोज्वळ असतात. त्यांचे व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत राहतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर चर्चेत आला आहे. ज्यात एका वानराच्या पिल्लाची मस्ती सगळ्याचं लक्ष वेधून घेत आहे. आपण अनेकदा वानर आपली नक्कल किंवा खोड काढताना दिसून येतात. मात्र, या व्हिडिओमध्ये एका वानराच्या पिल्लाने असे काही कृत्य केले आहे ज्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

या व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की एक तरुणी एका वानराच्या पिल्लांना गोंजारत आहे. त्यांच्या बाजूला बसून त्यांना खाऊ घालत आहे. इतक्यात त्या तरुणी जवळ वानराचा छोटा पिल्लू येतं. आणि असं काही करून जातो की ती मुलगी चक्क लाजून पूर्ण लाल होते.

त्या ठिकाणी वानराचं पिल्लू हळू हळू चालत तरुणी जवळ येतं. त्या तरुणीचा आपल्या छोट्या हाताने चेहरा पकडतो. आणि चक्क तिच्या ओठांचे चुंबन घेतो. हे पाहून तरुणी पहिल्यांदा विचारात पडते. आणि लाजून लाल होते.

सध्या हा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत असून, अनेकांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एकाने तर कमेंट करून शेवटी माकड हा आपलाच पूर्वज होता हे सिद्ध झालंय असं म्हंटल आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर @ashiq.billota या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ज्याला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत आहे.

टॅग्स :सोशल व्हायरलमाकडसोशल मीडियामाध्यमे