Lokmat Sakhi >Social Viral > घरात पुन्हा डोळ्यांनी दिसणार नाही झुरळं, एक्सपर्टनी सांगितला सोपा आणि स्वस्त एक उपाय

घरात पुन्हा डोळ्यांनी दिसणार नाही झुरळं, एक्सपर्टनी सांगितला सोपा आणि स्वस्त एक उपाय

Get rid of cockroach : महत्वाची बाब म्हणजे यासाठी आपल्या जास्त पैसे खर्च करण्याचीही गरज पडणार नाही. दुसरी महत्वाची बाब म्हणजे पुन्हा आपल्याला घरात झुरळं दिसणार नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 13:04 IST2025-08-25T13:03:36+5:302025-08-25T13:04:30+5:30

Get rid of cockroach : महत्वाची बाब म्हणजे यासाठी आपल्या जास्त पैसे खर्च करण्याचीही गरज पडणार नाही. दुसरी महत्वाची बाब म्हणजे पुन्हा आपल्याला घरात झुरळं दिसणार नाही.

Beast and easy homemade remedy to get rid of cockroach from house | घरात पुन्हा डोळ्यांनी दिसणार नाही झुरळं, एक्सपर्टनी सांगितला सोपा आणि स्वस्त एक उपाय

घरात पुन्हा डोळ्यांनी दिसणार नाही झुरळं, एक्सपर्टनी सांगितला सोपा आणि स्वस्त एक उपाय

Get rid of cockroach : झुरळांचा त्रास अलिकडे सगळ्याच घरांमधील वाढला आहे. किचन असो वा बेडरूम कानाकोपऱ्यांमध्ये झुरळांनी हैदोस घातलेला असतो. झुरळांचा सगळ्यात जास्त त्रास किचनमध्ये होतो. गॅसचा ओटा असेल, खाण्या-पिण्याचे पदार्थ असतील, भाजीपाला असेल सगळीकडे झुरळांचं साम्राज्य दिसतं. किचनमध्ये वापरले जाणारे कापड जरा जरी हलवले तर झुरळं भिरभिर पळताना दिसतात. आता तर सणांचा सीझन आहे, अशात झुरळं अधिक जास्त वाढतात.  बरेच लोक महागडे केमिकल्स आणि औषधांचा वापर करतात. पण तरीही काही फायदा होत नाही.

फेमस होम मेकर आणि कन्टेन्ट क्रिएटर शिप्रा राय यांनी झुरळांना पळवून लावण्याचा एक बेस्ट आणि सोपा उपाय सांगितला आहे. महत्वाची बाब म्हणजे यासाठी आपल्या जास्त पैसे खर्च करण्याचीही गरज पडणार नाही. दुसरी महत्वाची बाब म्हणजे पुन्हा आपल्याला घरात झुरळं दिसणार नाही. हा उपाय करण्यासाठी आपल्याला किचनमधीलच काही गोष्टी लागतील. पाहुयात काय काय लागेल.

झुरळांना पळवून लावणारा हा उपाय करण्यासाठी आपल्याला 6 ते 7 काळी मिरी, 6 ते 7 लवंग, 2 तेजपत्ते, टूथपेस्ट, एक वाटी आणि स्प्रे बॉटलची गरज पडेल.

कसं तयार कराल नॅचरल औषध?

सगळ्यात आधी एका वाटीमध्ये पाणी घ्या. नंतर लवंग आणि काळी मिरी चांगल्या बारीक करून घ्या. या दोन्ही गोष्टींचं पावडर पाण्यात मिक्स करा. नंतर तेजपत्त्यांचं पावडर त्यात टाका. या गोष्टी चांगल्या मिक्स करा. हे मिश्रण एका दुसऱ्या वाटीमध्ये गाळून घ्या आणि त्यात कोणतंही टूथपेस्ट मिक्स करा. 

हे मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये टाका किंवा कॉटनचे बॉल बनवून मिश्रणात बुडवा. पण सगळीकडे कॉटनचे बॉल ठेवणं शक्य नसतं. कानाकोपऱ्यांमध्ये सगळीकडे हे मिश्रण स्प्रे करा. 15 ते 20 दिवसांनंतर हा उपाय पुन्हा करा. झुरळं घरातून गायब झालेले असतील आणि पुन्हा परतही येणार नाहीत.

Web Title: Beast and easy homemade remedy to get rid of cockroach from house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.