Balcony Pigeon Control Tips : घराची बाल्कनी किंवा खिडकी या घरातील दोन जागा अशा असतात, ज्या अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतात. रिकाम्या वेळेत बाल्कनीत निवांत बसणे, झाडांची देखरेख करण्यात अनेकांना आनंद मिळतो. अनेकजण बाल्कनी किंवा खिडकी खूप सजवून ठेवतात. पण एका गोष्टीमुळे बाल्कनी किंवा खिडकीतील मोकळ्या जागेचा सत्यानाश होतो. ती म्हणजे कबुतरे. कबुतरं बाल्कनीत घरटं बनवतात, घाण करतात आणि सतत त्यांचा आवाज ऐकावा लागतो. शहरांमध्ये भरपूर लोक या समस्येने वैतागलेले असतात. असं नाही की, त्यांना पळवलं जात नाही. त्यांना एकदा हाकलून लावलं तरी ते पुन्हा येतात आणि घाण करतात. आपल्यासोबतही असंच होत असेल तर आम्ही आपल्यासाठी यावर सोपे जालीम उपाय घेऊन आलो आहोत. जर हे आपण केले तर कबुतरं बाल्कनी किंवा खिडकीत पुन्हा दिसणार नाहीत.
पुन्हा पुन्हा का येतात कबूतरं?
कबुतरं एकदा हाकलून लावल्यानंतरही पुन्हा पुन्हा त्याच जागेवर येतात, जिथे त्यांना बसायला, खायला मिळतं आणि सुरक्षित वाटतं. जर बाल्कनीमध्ये कोपरा मोकळा असेल जिथे ते आरामात बसू शकतात तर ते त्या जागेवर आपलं घरटं करणार. त्यामुळे गरजेचं आहे की, त्यांना बसण्यासाठी जागा राहू देऊ नका.
नेट लावणं बेस्ट
कबुतरांपासून बचाव करायचा असेल तर बाल्कनी किंवा खिडकीच्या ग्रीलला जाळी लावणं सगळ्यात बेस्ट उपाय आहे. थोडा खर्च होईल, पण हा सगळ्यात प्रभावी उपाय मानला जातो. बाजारात ट्रान्सपरंट नेट किंवा छिद्र असलेली नेट सहजपणे मिळेल. याने बाल्कनी पूर्ण कव्हर करा. याने हवाही खेळती राहील आणि कबुतरांपासून बचाव देखील होईल. तसेच कबुतरांचा इथे येण्याचा मार्गच बंद होईल
चमकदार वस्तूची फायदेशीर
कबुतरं चमकदार आणि सतत हलत राहणाऱ्या गोष्टींना घाबरतात. बाल्कनीत आपण जुन्या सीडी, अॅल्यूमिनिअम फॉयल किंवा रिफ्लेक्टिव टेप लटकवू शकता. हवा आल्यावर या गोष्टी हलतात आणि चमकतात सुद्धा, ज्यामुळे कबुतरं बाल्कनीत येण्यास घाबरतील.
लसूण, कापूर, काळी मिरी पूड
लसणाचा, कापराचा वास कबुतरांना आवडत नाही. या गोष्टी बाल्कनीच्या कोबऱ्यात ठेवल्यास कबुतरं तिथे येण्याचा धोका कमी होईल. काळी मिरीचं पाणी सुद्धा बाल्कनीत स्प्रे करू शकता. हे उपायही कबुतरांना पळवून लावण्यास फायदेशीर ठरतील.
स्वच्छताही महत्वाची
बाल्कनी किंवा खिडकी स्वच्छ ठेवणं फार गरजेचं आहे. जर या जागांवर अन्नाने कण, दाणे किंवा पाणी साचत राहिलं तर कबुतरं पुन्हा पुन्हा येतील. जर या जागा नेहमीच स्वच्छ असतील तर त्यांचाच तिथे येण्याचा इंटरेस्ट कमी होईल.
Web Summary : Pigeons return to balconies for food and shelter. Netting, shiny objects, garlic, pepper spray, and cleanliness can deter them. Prevent nesting by removing accessible spaces and food sources.
Web Summary : कबूतर भोजन और आश्रय के लिए बालकनी में लौटते हैं। जाली, चमकदार वस्तुएं, लहसुन, काली मिर्च का स्प्रे और सफाई उन्हें रोक सकते हैं। सुलभ स्थानों और खाद्य स्रोतों को हटाकर घोंसले बनाने से रोकें।