Lokmat Sakhi >Social Viral > चहा गाळण्यासाठी प्लास्टिकचं गाळणं वापरताय? आजच बंद करा कारण...

चहा गाळण्यासाठी प्लास्टिकचं गाळणं वापरताय? आजच बंद करा कारण...

Are you using a plastic strainer to strain tea? Stop using it today because : चहा गाळायला प्लास्टिक वापरत आहात, तर वेळीच सावध व्हा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2025 14:34 IST2025-02-23T14:32:41+5:302025-02-23T14:34:54+5:30

Are you using a plastic strainer to strain tea? Stop using it today because : चहा गाळायला प्लास्टिक वापरत आहात, तर वेळीच सावध व्हा.

Are you using a plastic strainer to strain tea? Stop using it today because... | चहा गाळण्यासाठी प्लास्टिकचं गाळणं वापरताय? आजच बंद करा कारण...

चहा गाळण्यासाठी प्लास्टिकचं गाळणं वापरताय? आजच बंद करा कारण...

कोणताही पदार्थ गाळण्यासाठी आपण गाळणं वापरतो. चहा, कढवलेलं तूप, कॉफी इतरही गाळून घेण्यासारखे पदार्थ आपण गाळण्यानेच गाळून घेतो. (Are you using a plastic strainer to strain tea? Stop using it today because...)पूर्वीच्या काळी त्यासाठी कापड वापरले जायचे. एखादं पातळ कापड वापरून पदार्थ गाळले जायचे. पण आता कापडाचा वापर कोणी करत नाही. वेगवेगळ्या प्रकारची गाळणी बाजारात उपलब्ध आहेत. आता कापडाचा वापर फक्त चहावाले करतात. ते कापड किती घाण होतं, ते तर आपण पाहतोच. त्यामुळे गाळणंच बरं. (Are you using a plastic strainer to strain tea? Stop using it today because...)गाळण्यासारख्या वस्तू विकत घेताना आपण काही विचार वगैरे करत नाही. खरं तर रोजच्या वापराची वस्तू आहे. पण दर्जापेक्षा आपण किंमतीला जास्त महत्व देतो. स्वस्तात मिळणारी गाळण म्हणजे प्लास्टिकचीच. मग आपण ती विकत घेतो. पण तुम्हाला माहिती आहे का? काही रूपये वाचवण्याच्या नादात आपण आजाराला आमंत्रण देत आहोत ते?

प्लास्टिकची गाळण वापरत असाल तर आजच बंद करा. प्लास्टिकच्या गाळण्यामुळे किडनीचे विविध आजार होतात. प्लास्टिक ना निसर्गासाठी चांगलं, ना शरीरासाठी. प्लास्टिकचा वापर आपण टाळण्याचा प्रयत्न करतो. मग एखादा अन्न पदार्थ गाळण्यासाठी प्लास्टिकचा वापर करणे, किती घातक असू शकते? ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. प्लास्टिकमधील रसायनांमुळे कॅन्सरसारखे भयंकर आजार होऊ शकतात. जेव्हा आपण गरम काही प्लास्टिकमधून गाळतो, तेव्हा त्या गाळण्यातील रसायनांचे कणही गाळले जातात. ते चहामध्ये मिसळतात. 

भारतात घरोघरी दिवसातून किमान दोन वेळा तरी चहा तयार केला जातोच. चहाला भारतीय प्रेम मानतात. पण चहा चुकीच्या गाळण्यातून गाळल्यामुळे जर शरीराला त्रास होणार असेल, तर ते गाळणे नक्कीच बदलले पाहिजे. बाजारात स्टीलची गाळणी मिळते. ती वापरा. स्टीलची गाळणी जास्त काळ टिकतेही. तसेच मजबुतीलाही चांगली असते. प्लास्टिकपेक्षा जरा महाग असते म्हणून आपण ती विकत घेत नाही. पण अशा गंभीर आजारांचा जर धोका असेल तर. चार पैसे जास्त गेलेले चालतात. आजच स्टीलचं गाळण आणा आणि प्लास्टिकच्या गाळण्याला टाटा-बाय-बाय करा.           

Web Title: Are you using a plastic strainer to strain tea? Stop using it today because...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.