Join us

कुणाच्या लेकरावर, कुणाच्या मरणावर मिम करुन हसणारे, ट्रोल करणारे चक्रम असतात की विकृत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2025 19:45 IST

Are those who laugh and troll at someone's child or death, crazy or perverted? :माझं लेकरु म्हणजे मनोरंजन नव्हे, संजना गणेशनने ठणकावून सांगितलंच पण म्हणून मिम आणि रिलची टवाळी थोडीच थांबते!

सोशल मीडियात कुणीही कुणालाही वाट्टेल तसे ट्रोल करु शकतो. अपमान होतात. टिप्पण्या होतात. आणि सेलिब्रिटींच्या तर मुलं, पालक यांनाही लोक वाट्टेल ते बोलतात. (Are those who laugh and troll at someone's child or death, crazy or perverted?)आपल्या लहानशा लेकावर वाट्टेल त्या टिप्पणी करणाऱ्या लोकांना अलिकडेच संजना गणेशनने चांगलेच ठणकावले. आमचा लेक तुमच्या मनोरंजनाचं साधन नाही असं तिनं निक्षून सांगितलं. संजना स्वत: सेलिब्रिटी टीव्ही प्रेझेंटर आहे, आणि भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहची बायको आहे. एका मुलाची आई म्हणून तिचा रास्त संताप तिनं व्यक्त केला. (Are those who laugh and troll at someone's child or death, crazy or perverted?)पण ही गोष्ट फक्त एवढीच नाही. 

आजकाल बहूसंख्य लोक सोशल मीडिया ॲडिक्टेड आहे. आजकाल सोशल मिडियावरील व्हिडिओ, रिल्स पाहून माणसे त्यानुसार मतं तयार करतात. मानसिकतेवरती त्याचा परिणाम होतो.  सध्या प्रत्येक गोष्टीवर मिम्स तयार केले जातात. हे असे विनोद असतात ज्यामध्ये काही गोष्टींची खिल्ली उडवली जाते. असा कंनटेंन्ट लोकांना फार जास्त आवडतो. इंस्टाग्रामवर अर्ध्याहून अधिक मिम्सचाच कंनटेन्ट असतो.  मिम्स तयार करुन एखाद्या अनोळखी व्यक्तीवर हसतात. लाखोच्या संख्येत लोक असे रिल्स बघतात. मात्र त्या व्यक्तीला काय वाटत असेल याचा विचार केला जात नाही. आपण कशावर हसायला हवे कशावर नाही याचे भान लोकांना उरलेले नाही आणि हीच सध्या परिस्थिती आहे. एखाद्याच्या व्यथांवर किंवा परिस्थितीवर मिम्स तयार केले जातात. या कृतीमधून लोकांची बदलणारी मानसिकता दिसून येते.

काही दिवसांपूर्वी मुंबई इंडियन्सच्या एका सामन्या दरम्यान जसप्रित बुमराहने चार विकेट घेतल्या. त्याच्या यशाची प्रतिक्रिया घेण्यासाठी कॅमेरामॅनने संजना म्हणजेच बुमराहच्या पत्नीच्या दिशेने कॅमेरा वळवला. त्यामध्ये बुमराहचा मुलगा अंगदही दिसला. अंगद फक्त २ वर्षाचा आहे. त्याने कोणतीही प्रतिक्रिया न देणं हे सामान्यच आहे. मात्र त्या व्हिडिओचे अनेक मिम्स करण्यात आले. असे ही काही केले गेले जे फार लाजिरवाणे आहेत. देशासाठी खेळणाऱ्या एका खेळाडूच्या २ वर्षाच्या मुलाचे असे मिम्स बनवणे किती योग्य आहे आणि किती अयोग्य हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे असे म्हणत संजनाने मात्र सोशल मिडियावर लोकांना चांगलेच ऐकवले.

संजना म्हणाली, सोशल मिडिया अत्यंत नीच वृत्तीची जागा होत चालली आहे. मात्र माझा मुलगा तुमच्यासाठी हसण्याचा विषय असू शकत नाही. असे म्हणत तिने राग व्यक्त केला.  आजकाल एखाद्याच्या मृत्यूचाही मिम तयार केला जातो. तयार करणारा एकच असतो मात्र आश्चर्याची गोष्ट ही आहे की त्या मिमला लाईक करणाऱ्यांची संख्या कोटीत असते. सोशल मिडिया लोकांना हार्टलेस करत आहे का ? असा प्रश्न उद्भवतो.

टॅग्स :संजना गणेशनसोशल मीडियाट्रोलजसप्रित बुमराह