सुंदर दिसण्याची इच्छा सर्वांनाच आहे पण एका बुल्गारियाच्या तरुणीने असं काही केलं ज्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. २८ वर्षीय एंड्रिया इवानोवाला तिचे ओठ थोडे मोठे आणि आकर्षक हवे होते, तिने तसं स्वप्न पाहिलं होतं. मात्र तिची ही हौस आता तिला महागात पडली आहे. सुंदर दिसण्याच्या नादात चेहऱ्याची पार वाट लावली.
न्यू यॉर्क पोस्टमधील एका रिपोर्टनुसार, एंड्रिया इवानोवाने तिच्या ओठांमध्ये फिलर्स इंजेक्ट करण्यास सुरुवात केली. हळूहळू तिने ते इतके मोठे केले की तिचे ओठ आता फुग्यांसारखे दिसतात. आतापर्यंत जवळजवळ २० लाख रुपये खर्च केले आहेत आणि सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ती अजूनही हे करायचं थांबत नाहीत. दरमहा ओठांमध्ये हायलुरोनिक एसिड इंजेक्शन घेते.
एंड्रियाने तिची हनुवटी, गाल आणि जबड्यावर देखील फिलर्स लावले आहेत. तिने ६०० सीसी सिलिकॉन इम्प्लांटसह ब्रेस्ट ऑग्मेंटेशन सर्जरी देखील केली आहे. अनेक सर्जरी आणि इंजेक्शन्सनंतर एंड्रियावर आता तिच्या शहरातील कोणताही डॉक्टर उपचार करायला तयार नाही. ते म्हणतात की, जर तिला पुन्हा इंजेक्शन्स दिली तर रक्त प्रवाह रोखला जाऊ शकतो आणि तिच्या ओठांचं मोठं नुकसान होऊ शकतं.
सर्जरीच्या या आवडीमुळे एंड्रियाचं जीवन कठीण झालं आहे. यामुळे तिच्या दातांमध्ये भेगा पडल्या, खूप वेदना झाल्या. पण डेटिस्टही तिच्यावर उपचार करण्यास तयार नव्हता. ती अनेक डॉक्टरांकडे गेली पण सर्वांनी तिला नकार दिला. जवळच्या लोकांनी, नातेवाईकांनी तिला पुन्हा सर्जरी न करण्याचा सल्ला दिला आहे पण एंड्रिया कोणाचंही ऐकत नाही.
