Join us  

हृदयद्रावक! त्वचेचा सावळा रंग दीड वर्षाच्या मुलीच्या जीवाशी; वडिलांनी दिलं विष कारण..

By भाग्यश्री कांबळे | Published: April 08, 2024 5:46 PM

Andhra man poisons 18-month-old daughter for being dark-skinned : २१व्या शतकातही मुली सुरक्षित नाही? वडिलांना मुलीचा आवडत नव्हता सावळा रंग म्हणून..

भाग्यश्री कांबळे

२१ व्या शतकात लोक निकोप विचार करू लागले आहेत. तरी देखील काही लोकांच्या खुळचट विचारांमुळे आपण प्रगतशील भारतात जगत आहोत का? असा प्रश्न निर्माण होतो. आता हेच बघा ना, महिला प्रत्येक क्षेत्रात नाव कमवत आहे. तरी देखील, तिच्या मागे अनेक गोष्टी लादल्या जातात (Social Viral). आजही महिलांना तिच्या रंगावरून, कपड्यावरून ट्रोल केलं जातं. मुलगी जास्त सावली नको, बायकोचा रंग उजळच हवा (Andhra Pradesh).

समाजाच्या नजरेसमोर महिलेचा रंग उजळ असेल तरच ती सुंदर असे म्हटले जाते. पण गोरा रंगच सुंदरतेचं प्रतिक मानला जातो हे कोणी ठरवलं? बऱ्याच महिला त्वचेच्या रंगामुळे बळी पडतात, आणि अशाच एका करणामुळे एका चिमुकलीचा बळी पडला आहे. आंध्रप्रदेशमधील एका मुलीला तिच्या सावळ्या रंगामुळे प्राण गमवावे लागले असून, तिच्या मृत्यूला कारणीभूत तिचे वडीलच ठरले आहेत. नक्की प्रकरण काय? पाहूयात(Andhra man poisons 18-month-old daughter for being dark-skinned).

सावळा रंग का नको....?

ही हृदयद्रावक घटना आंध्रप्रदेशच्या पेटासनेगंडला येथे घडली. एका वडिलांनी आपल्या पोटच्या दीड वर्षाच्या मुलीच्या सावळ्या रंगाचा द्वेष केला, आणि याच रंगाच्या द्वेषातून तिला ठार मारलं. अवघ्या १८ महिन्यांच्या चिमुकलीचे नाव अक्षया असून, या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

शंभरीच्या उंबरठ्यावर महिलेला मिळालं अमेरिकन नागरिकत्व, अमेरिकन ड्रिमची ‘अशी’ही गोष्ट

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, जन्मतःच अक्षयाचे वडील महेशने तिला मायेने जवळ घेतलं नाही. त्याने काही दिवसांपूर्वी चिमुकलीला प्रसादामध्ये विष मिसळून खायला दिले. ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. ३१ मार्च रोजी चिमुकली घरात बेशुद्ध अवस्थेत सापडली, आणि तिच्या नाकातून रक्त वाहत होते. तिला तातडीने कारेमपुडीच्या सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. पण तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

मुख्य म्हणजे घडलेली घटना, महेशने कोणालाही न सांगण्याचा अक्षयाची आई श्रावणीवर दबाव टाकला  होता. पण तिने कारेमपुडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंद केली.

कधी पाण्यात बुडवून तर कधी भिंतीवर आदळून मारलं

या जोडप्याचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना दीड वर्षांपूर्वी कन्यारत्न झालं. एसआय ऑफिसर रमांजनेयुलू यांनी टाईम्स ऑफ इंडियाला माहिती देताना सांगितले की, 'श्रावणीने मुलीच्या रंगावरून, तिच्या सासरच्याकडून आणि महेशकडून छळ होत असल्याबद्दल सांगितले. सावळ्या रंगाच्या बाळाला जन्म दिल्याचा आरोप तिच्या सासरच्या मंडळींनी केला. या प्रकरणाचा तपास होऊ नये म्हणून, बाळाला त्वरित दफन करण्यात आले. ही घटना घडल्यानंतर श्रावणी आणि श्रावणीच्या आईने स्थानिक पंचायतीला माहिती दिली.'

३ मुलांची आई खांबावर जाऊन बसली; अजब तिची मागणी म्हणते ‘दोघांसोबत’ राहीन कारण..

श्रावणीने दिलेल्या माहितीनुसार, 'महेशने यापूर्वीही अक्षयाला ठार मारण्याचा कट रचला. त्याने अनेकदा तिला भिंतीवर फेकले, काळोख्या खोलीत बंद करून ठेवायचा, शिवाय टबमध्ये पाणी भरून त्यात बुडवून जीवे मारण्याचा प्रयत्नही केला.' हे प्रकरण घडल्यानंतर आंध्र प्रदेशसह इतरही राज्य हादरले असून, याबाबत आंध्र प्रदेश बालहक्क सरंक्षण आयोगाने तपास सुरु केला आहे. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया