>सोशल वायरल > सारी सबसे प्यारी; असं म्हणत सारा अली खान ट्रॅडिशनल- ट्रेंडी दिसते तेव्हा..

सारी सबसे प्यारी; असं म्हणत सारा अली खान ट्रॅडिशनल- ट्रेंडी दिसते तेव्हा..

साराची कलरफुल साडी! साराच्या लूकवर चाहते फिदा, अशी होती रंगबेरंगी साडीची किमया..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 06:41 PM2021-09-27T18:41:54+5:302021-09-27T18:42:50+5:30

साराची कलरफुल साडी! साराच्या लूकवर चाहते फिदा, अशी होती रंगबेरंगी साडीची किमया..

All the sweetest; Saying this when Sara Ali Khan looks traditional- trendy .. | सारी सबसे प्यारी; असं म्हणत सारा अली खान ट्रॅडिशनल- ट्रेंडी दिसते तेव्हा..

सारी सबसे प्यारी; असं म्हणत सारा अली खान ट्रॅडिशनल- ट्रेंडी दिसते तेव्हा..

Next
Highlights साराने नेसलेली साडी अतिशय सुंदर तर आहेच, पण त्यासोबतच सगळ्यात जास्त चर्चा होत आहे, ती तिच्या साध्या, सोज्वळ पण तेवढ्याच स्टनिंग लूकची.

सारा अली खान, बॉलीवूडच्या नव्या पिढीतलं एक दमदार नाव. सैफ अली खान आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंग यांची लेक म्हणजे सारा अली खान. आई आणि वडील या दोघांचंही सौंदर्य सारामध्ये पुरेपुर उतरलं आहे. पतौडी घराण्याची राजकुमारी असणारी सारा दिसायलाही अतिशय लोभसं. तिचं वागणं आणि बोलणंही तिच्या एवढंच सुंदर आहे, असं साराला जवळून ओळखणारे अनेक जण सांगतात. आता सध्या सोशल मिडियावर प्रचंड चर्चा सुरु आहे, ती साराच्या कलरफुल साडीची. 

 

साराची ब्यूटीफुल साडी पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले आहे. सारा अली खानने तिचे फोटो नुकतेच सोशल मिडियावर शेअर केले आहेत. साराने नेसलेली साडी अतिशय सुंदर तर आहेच, पण त्यासोबतच सगळ्यात जास्त चर्चा होत आहे, ती तिच्या साध्या, सोज्वळ पण तेवढ्याच स्टनिंग लूकची. साराचा हा लूक कोणत्याही तरूण मुलीला आवडणारा असून तो तुम्ही एखाद्या कार्यक्रमात किंवा सणावाराला नक्कीच करू शकता. 'Because women in a Sari
Are always Pyaari' अशी कॅप्शनही साराने या फोटाेंना दिली आहे. 

 

आहे कशी साराची साडी?
साराने नेसलेली साडी डार्क पिंक रंगाची आहे. साराच्या गोऱ्या रंगाला ती साडी अधिकच शोभून दिसते आहे. डार्क पिंक कलरच्या साडीचे काठ फारसे मोठे नसून ते पिवळ्या रंगाचे आहेत. त्यावर साराने बेबी पिंक रंगाचे स्लिव्हलेस ब्लाऊज घातले आहे. साराची ही साडी प्रिंटेड पाॅलिस्टर प्रकारातली असून साडीवर अनेक ब्राईट रंग वापरण्यात आले आहेत. पाहताक्षणी ही साडी बांधणीच्या साडीशी मिळतीजुळती वाटते, पण प्रत्यक्षात त्यापेक्षाही खूपच वेगळी आहेत. निळा, पिवळा, बेबी पिंक, लाल असे अनेक रंग या साडीमध्ये असून ब्राईट रंग आवडणाऱ्या महिलांना ही साडी विशेष आवडणारी आहे.

 

असा आहे साराचा लूक
साराने घातलेली ज्वेलरी देखील अतिशय हटके लूक देणारी आहे. साराने हातात गुलाबी आणि पिवळ्या मॅट फिनिशिंग असणाऱ्या हातभर बांगड्या घातल्या आहेत. गोल्डन रंगातले कानातले झुमके बऱ्यापैकी मोठे आहेत. यामुळे गळ्यात काही विशेष घालण्याची गरज वाटत नाही. याशिवाय नाकात साराने छोटीशी खड्याची मोरणी घातली असून यामुळे तिचे चाफेकळी नाक अधिकच धारदार दिसत आहे.

 

निळ्या रंगाची बारीक टिकली साराचे सौंदर्य खुलविणारी आहे. अशाप्रकारे छान सजलेल्या साराचे फोटो पाहून तिचे चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत. साराचे फोटो पाहिल्यानंतर स्क्रिन स्क्राेल करणेच विसरुन गेलो आणि तिचे फोटो पाहत बसलो, असेही तिच्या एका चाहत्याने कमेंटमध्ये लिहिले आहे. 

 

Web Title: All the sweetest; Saying this when Sara Ali Khan looks traditional- trendy ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

संबंधित बातम्या

Spitting In Food : किती हा विचित्रपणा! सुपरमार्केटमधील खाण्यापिण्याच्या वस्तूंवर थुंकायची महिला; व्हिडीओ समोर येताच अटकेची मागणी - Marathi News | Spitting In Food : Disgusting act woman spitting in food lady spit into chips and water bottle at mall | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सुपरमार्केटमधील खाण्यापिण्याच्या वस्तूंवर थुंकायची महिला; व्हिडीओ समोर येताच अटकेची मागणी

Spitting In Food : सोडा आणि कँडीच्या पाकीटांच्या बाबतीतही तिनं असाच प्रकार केला. ...

‘मी फार एकटी पडले होते, कशी जगले कुणास ठाऊक!’ - जॅकलीन फर्नांडीसला डिप्रेशन आलं तेव्हा.. - Marathi News | Jacqueline fernandez on depression loneliness low phase of her life how she dealt with it | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :‘मी एकटी पडले होते, कशी जगले कुणास ठाऊक!’ - जॅकलीन फर्नांडीसला डिप्रेशन आलं तेव्हा..

Jacqueline fernandez on depression loneliness : सोशल मीडियाही तुम्ही वापरता त्यामुळे लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात, तुमच्याबद्दल काय म्हणतात, एवढी माहिती तुमच्याकडे असते.आणि त्याचकाळात डिप्रेशन पोखरायला लागतं तेव्हा, सांगतेय जॅकलीन. ...

लिपस्टिक आज पुसणार, उद्या पुन्हा तोंडाला फासणार! #BanLipstick वर चिडले नेटिझन्स, म्हणाले बंद करा आचरटपणा - Marathi News | Netizens angry over on lipstick ban trend of marathi actress goes viral on social media | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लिपस्टिक आज पुसणार, उद्या पुन्हा तोंडाला फासणार! #BanLipstick वर चिडले नेटिझन्स

lipstick ban trend : महाराष्ट्रासारख्या महान राज्यात असले फालतू बॅन लिपस्टिक वगैरे आंदोलन करून काय फायदा. ...

महिलांनीच का करावं घरातलं काम? आता सरकारच देणार पुरूषांना स्वयंपाक अन् साफसफाईचे धडे - Marathi News | kerala govt cooking class for boys men gender equality | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :महिलांनीच का करावं घरातलं काम? आता सरकारच देणार पुरूषांना स्वयंपाक अन् साफसफाईचे धडे

kerala govt cooking class for boys men gender equality : लिंग समानता सुनिश्चित करण्यासाठी स्मार्ट किचन कार्यक्रमाचा एक भाग म्हणून जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. ...

गुगल का साजरा करतेय पिझ्झा डे? अनोखा खेळ आणि मस्त डुडल, हे आहे तरी काय? - Marathi News | Google Celebrates Pizza Day? Unique game and cool doodle, what is it? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गुगल का साजरा करतेय पिझ्झा डे? अनोखा खेळ आणि मस्त डुडल, हे आहे तरी काय?

पिझ्झा डे स्पेशल डुडल गेम, पिझ्झा आवडतो मग कापून पण दाखवा की... ...

No high heels: उंच टाचांच्या चपला आम्हाला नकोत असं का म्हणतात जगभरात बायका? - Marathi News | Why there is no high heels trend in the world? History of high heels | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :No high heels: उंच टाचांच्या चपला आम्हाला नकोत असं का म्हणतात जगभरात बायका?

No high heels: महिलांमध्ये असणारं उंच टाचांच्या चपलांचं वेड एकदम का कमी होतंय.... जगभरात सुरु झालेला हा No high heels ट्रेण्ड नेमका आहे तरी काय... ...