Join us  

हृदयस्पर्शी! विमानात बाळ रडायला लागलं, पुरुष फ्लाइट अटेंडंटने त्याला कुशीत घेऊन जोजवलं आणि..

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2022 3:56 PM

Air india flight kid start crying staff : सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये फ्लाइटमध्ये एक मूल रडू लागले. त्या मुलाला झोपवायला आणि शांत ठेवण्यासाठी, एक फ्लाइट अटेंडंट येतो आणि त्याला आपल्या कडेवर घेऊन जोजवतो, थोपटतो.

फ्लाइटमधील प्रवासादरम्यान अनेक वेळा लोक लहान मुलांसोबत प्रवास करतात. मात्र, काही मुलांना विमानात प्रवास करायला आवडत नाही आणि ते विमानातच रडायला लागतात.  विमानात मूल रडायला लागलं की बाकीचे प्रवासी नाकं मुरडतात. त्यांना त्रास होतो. आईबाबांना कळत नाही की आता नेमकं काय करावं? ते काही तास भयंकर वाटतात. मात्र अनेकदा महिला फ्लाइट अटेंडंट त्यांना मदत करतात. यावेळी मात्र एक तरुण पुरुष फ्लाइट अटेंडंट स्वत:हून लहान बाळाला जवळ घेत त्याला शांत करताना दिसतो. हे मायाळू रुप नेटिझन्सना फारच आवडलेले दिसते. (Air india flight kis start crying staff heart warming act will make your day)

सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये फ्लाइटमध्ये एक मूल रडू लागले. त्या मुलाला झोपवायला आणि शांत ठेवण्यासाठी, एक मेल फ्लाइट अटेंडंट येतो आणि त्याला आपल्या कडेवर घेऊन गप्प करतो. हा व्हिडिओ एअर इंडियाचा आहे, व्हायरल झालेल्या व्हिडिओने ऑनलाइन लाखो नेटिझन्सची मने जिंकली आहेत.

हा व्हिडिओ जीवन व्यंकटेश नावाच्या एका इंस्टाग्राम वापरकर्त्याने पोस्ट केला आहे, 'एअर इंडियाच्या कर्मचार्‍यांच्या गोड हावभावाचे खरोखर कौतुक केले जात आहे. माझ्या मुलीला त्या स्टाफच्या खांद्यावर आराम वाटला तेव्हा आश्चर्य वाटले, धन्यवाद. हे माझ्यासाठी खूप आहे. टाटांच्या ताब्यानंतर या प्रवासात बदल पाहायला मिळला.' मुलाला शांत करण्यासाठी फ्लाइट दरम्यान, नील मलकम नावाचा फ्लाइट अटेंडंट बाळाला जोजवताना दिसतोय.

हा व्हिडिओ 7 ऑगस्ट रोजी पोस्ट करण्यात आला होता.रडकं बाळ आईने किंवा अन्य महिलेनंच सांभाळणं हे आपल्याकडे सर्वत्र दिसतं. मात्र हा पुरुष कर्मचारी ज्या सहजतेनं ते काम करतो ते पाहून अनेकांना त्याचं कौतुकही वाटलं.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया