Join us

रश्मिका मंदानानंतर ही अभिनेत्री झाली उप्स मोमेंटची शिकार; घोळ झाला कारण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2022 19:11 IST

Oops Moment : कपड्यांवरुन ट्रोल होणाऱ्या अभिनेत्रींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून रकुल प्रीतच्या अंगभर कपड्यांनी पुन्हा घोळ केला आहे.

ठळक मुद्देरकुल प्रीत सिंहने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात साऊथ चित्रपटांमधून केली होती. मात्र अजय देवगणच्या 'दे दे प्यारी दे' या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले

बॉलीवूड अभिनेत्री अनेकदा त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील हॉट फोटोंसाठी चर्चेत असतात. रकुल प्रित सिंह ही अभिनेत्रीही नेहमी सोशल मीडिया अकाऊंटवर आपले फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. नुकताच रकुल प्रीतचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये पूर्ण ड्रेस घालूनही ती ओप्स मोमेंट (Oops Moment) ला बळी पडली आहे. रकुल प्रीत सिंहने काळ्या रंगाचा मॅक्सी ड्रेस घातलेला दिसत आहे. हा ड्रेस इतका ट्रान्सपरंट आहे की, कॅमेऱ्याची लाईट पडताच तिचे अंडरगारमेंट्स दिसू लागले. आता ड्रेस इतका ट्रान्सपरंट आहे म्हटल्यावर तिने त्यामध्ये स्लिप घालणे अपेक्षित होते. मात्र तिने तसे न केल्याने तिचा Oops Moment कॅमेऱ्यात कैद झाला.

अनेकवेळा अभिनेत्रींनी घातलेले कपडे त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरतात. कारण त्यांचे कॅमेरात कैद झालेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात आणि त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जाते. रकुल प्रीतने घातलेला ड्रेस इतका पातळ फॅब्रिकचा आहे की कॅमेराचा लाईट पडताच तिचे अंडरगारमेंन्ट दिसतात. पापाराझीने घेतलेले तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आपले अशाप्रकारच्या कपड्यांमध्ये फोटो काढण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर घाईनेच रकुल प्रीत गाडीत बसली. याआधीही अशाप्रकारे अनेक अभिनेत्रींना त्यांच्या कपड्यांवरुन ट्रोल करण्यात आले आहे.

(Image : Google)

काही दिवसांपूर्वीच लोकांनी अभिनेत्री रश्मिका मंदानाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. कारण यामध्ये ती एका लाइव्ह इव्हेंटमध्ये Oops Moment ची शिकार झाली होती. या लाईव्ह इव्हेंटमध्ये रश्मिकाने पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. मुलाखतीदरम्यान, तिने अवघडल्यासारखे झाल्यावर तिने आपल्या पायांची स्थिती बदलली होती. त्यावेळी तिचे अंतर्वस्त्र दिसले होते, हा मोमेंट कॅमेरात कैद झाला आणि तो व्हिडिओ व्हायरल करत नेटीझन्सनी तिला ट्रोल केले. यानंतर आता रकुल प्रीतलाही तिच्या कपड्यांवरुन ट्रोल करण्यात येत आहे. 

रकुल प्रीत सिंहने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात साऊथ चित्रपटांमधून केली होती. मात्र अजय देवगणच्या 'दे दे प्यारी दे' या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि आपला ठसा उमटवला. गेल्या काही दिवसांपासून रकुल सोशल मीडियावर बरीच अॅक्टीव्ह आहे. काही दिवसांपूर्वी, रकुल प्रीत सिंगच्या वाढदिवसानिमित्त, पूर्वीचा अभिनेता आणि निर्माता जॅकी भगनानीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून त्यांचे नाते अधिकृत केले होते. एक रोमँटिक फोटो शेअर करताना जॅकीने चाहत्यांना ही खुशखबर दिली. या फोटोमध्ये रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांनी एकमेकांचा हात धरल्याचे दिसले होते. 

टॅग्स :सोशल व्हायरलरकुल प्रीत सिंगसोशल मीडिया