Join us

बेसूर गाणं ऐकून कुत्र्यानेच कानावर ठेवला हात, नक्की झालं काय, पाहा व्हायरल व्हिडिओ..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2022 13:38 IST

Social Viral महिलेचं बेसूर गाणं ऐकायला लागू नये म्हणून कुत्र्याने चक्क आपले कान धरले..

सोशल मीडियावर असंख्य व्हिडिओ व्हायरल होत राहतात. जरा काही हटके कंटेंट मिळाला की व्हिडिओमधील व्यक्ती रातोरात स्टार झालीच म्हणून समजा. काही व्हिडिओवर प्राण्यांचे अचंबित करणाऱ्या गोष्टी पाहायला मिळतात. मुक्या प्राण्यांच्या हावभाव पाहून नेटकऱ्यांना हसू आवरत नाही. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला गाणं म्हणत असताना कुत्र्याने दिलेली प्रतिक्रिया पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला माईकवर गाणे म्हणत आहे. ती गाणं म्हणत असताना, तिथे बाजुला बसलेल्या कुत्र्याने चक्क कानावर हात ठेवल्याचे दिसत आहे. त्याने फरशीवर झोपून आपले कान धरले असून, आजूबाजूचे व्यक्ती हसताना दिसून येत आहे. कदाचित महिलेचा आवाज बेसूर असल्याने कुत्र्याला तो आवाज नकोसा झाला असेल, असा अंदाज नेटकऱ्यांनी व्यक्त केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे..

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाकुत्रा