lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > सैयां हटो जाओ..! गजगामिनी-ये कैसी चाल है? मधुबाला-माधुरी दीक्षित आणि आदितीची पाहा कातिल अदा

सैयां हटो जाओ..! गजगामिनी-ये कैसी चाल है? मधुबाला-माधुरी दीक्षित आणि आदितीची पाहा कातिल अदा

Aditi Rao Hydari’s sensual Gajgamini walk from Heeramandi goes viral : आदिती राव हैदरीच्या 'गजगामिनी चाल'वर प्रेक्षक फिदा, पण गजगामिनी चाल हा प्रकार तरी काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2024 05:57 PM2024-05-14T17:57:28+5:302024-05-14T17:58:36+5:30

Aditi Rao Hydari’s sensual Gajgamini walk from Heeramandi goes viral : आदिती राव हैदरीच्या 'गजगामिनी चाल'वर प्रेक्षक फिदा, पण गजगामिनी चाल हा प्रकार तरी काय?

Aditi Rao Hydari’s sensual Gajgamini walk from Heeramandi goes viral | सैयां हटो जाओ..! गजगामिनी-ये कैसी चाल है? मधुबाला-माधुरी दीक्षित आणि आदितीची पाहा कातिल अदा

सैयां हटो जाओ..! गजगामिनी-ये कैसी चाल है? मधुबाला-माधुरी दीक्षित आणि आदितीची पाहा कातिल अदा

संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांची 'हीरामंडी' ही वेबसिरीज नुकतीच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. सर्वत्र या वेबसीरिजचं कौतुक होत आहे. 'हीरामंडी : द डायमंड बाजार' (Heeramandi) या वेब सिरीजमध्ये अनेक अभिनेत्रींनी काम केलं. प्रत्येक अभिनेत्रीने साकारलेलं पात्र, कौतुकास्पद ठरत आहे. मुख्य म्हणजे या सीरिजमधील अभिनेत्री आदिती राव हैदरीच्या (Aditi Rao Hydari) 'गजगामिनी वॉक'ने (Gajgamini) चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं आहे.

नेटकरी अदितीच्या 'गजगामिनी चाली' वर फिदा झाले आहेत. पण फक्त अदितीनेच स्क्रीनवर 'गजगामिनी वॉक' सादर केला नसून, अभिनेत्री मधुबाला आणि माधुरी यांनी देखील ही 'चाल' स्क्रीनवर उत्तमरित्या साकारली आहे. 'गजगामिनी वॉक' म्हणजे काय? या निमित्ताने अभिनेत्री मधुबाला आणि माधुरी यांनी 'गजगामिनी चाल' आणि अदा कशी सादर केली होती पाहूयात(Aditi Rao Hydari’s sensual Gajgamini walk from Heeramandi goes viral).

'गजगामिनी वॉक' म्हणजे काय?

अभिनेत्री अदिती राव हैदरी हिनं हीरामंडीमध्ये बिब्बो जानची भुमिका साकारली आहे. ‘सैयां हटो जाओ’ या गाण्यावर अदिती मुजरा करताना दिसते. या गाण्यात अदिती कॅमेऱ्याकडे पाठ करून चालत पुढे गेली. ती चाल सामान्य चाल नसून, त्या चालीला 'गजगामिनी चाल' असं म्हणतात.

संस्कृतमध्ये 'गजगामिनी चाली'चा अर्थ म्हणजे हत्तीची चाल असा होतो. म्हणजेच हत्तीसारखे चालणे, हलणे आणि शांतपणे डोलत चालणं. कथ्थक या भारतीय शास्त्रीय नृत्यात गजगामिनी चालीला विशेष महत्त्व आहे. या नृत्यप्रकारात गजगामिनी चाल शिकवली जाते.

FSSAI म्हणते 'या' पिठाच्या चपात्या खा; बीपीही नॉर्मल आणि हाडंही होतील मजबूत! पाहा कोणतं ते पीठ

अदितीआधी माधुरी यांनी केला होता 'गजगामिनी वॉक'

आदिती राव हैदरीआधी २००० साली एमएफ हुसैन दिग्दर्शित 'गज गामिनी' या चित्रपटात माधुरी दीक्षितने गजगामिनी वॉक स्क्रीनवर सादर केला होता. या व्हिडिओमध्ये माधुरीची चाल लोकांना मंत्रमुग्ध करून सोडणारी ठरली होती. तिच्या चालीचे देखील प्रेक्षकांनी कौतुक केलं होतं.

अभिनेत्री माधुरी आधी प्रेक्षकांची ऑल टाईम फेवरीट मधुबाला यांनी साकारलेली गजगामिनी चाल

स्वयंपाकात वापरा '१' हेल्दी तेल! उच्च रक्तदाब - वजन वाढ - हार्ट अॅटॅक येण्याची भीती कमी-आरोग्यही निरोगी राहील..

'मुगल-ए-आझम' चित्रपटातील 'मोहे पनघट पे' हे गाणं आजही लोकांच्या मनात अधिराज्य गाजवत आहे. यात अभिनेत्री मधुबाला यांनी आपल्या विशेष शैलीत गजगामिनी चाल सादर करून प्रेक्षकांना घायाळ केलं. त्यांची चाल यासह मोहक अदाकारी देखील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी ठरली आहे. 

Web Title: Aditi Rao Hydari’s sensual Gajgamini walk from Heeramandi goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.