अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास आता लवकरच सुरू होत आहे. या महिन्याला धोंड्याचा महिना असं देखील म्हटलं जातं. अधिक मासाच्या महिन्यात सगळ्यात जास्त महत्त्व असते ते जावयाला. या महिन्यात जावयाला घरी जेवणासाठी आमंत्रित केले जाते आणि त्याला वाण म्हणून काही गोड पदार्थ दिले जातात. त्यासोबतच आपल्या ऐपतीनुसार सोन्या-चांदीची एखादी वस्तू आणि कपड्यांचा आहेरही केला जातो. आता जावयाला वाण म्हणून नेमकं काय द्यावं आणि ते कसं द्यावं ते पाहुया..(Adhik Maas 2026 van ideas)
अधिक मासानिमित्त जावयाला कशाचे वाण दिले जाते?
आपल्याकडे अशी परंपरा आहे की एक ताट जावयासाठी घेतले जाते. अगदी स्टीलचे, तांब्याचे, पितळाचे ताटही तुम्ही घेऊ शकता. ज्यांना परवडतं ते चांदीच्या ताटातही वाण देतात. मुळात कशात वाण द्यायचे हा मुख्य प्रश्न नसतोच. तर वाण म्हणून काय द्यावे हे महत्त्वाचे असते.
शेफ संजीव कपूर सांगतात ३ टिप्स-कारल्याचा कडूपणा गायब आणि भाजी होईल चमचमीत
या ताटामध्ये एक दिवा ठेवला जातो आणि त्यामध्ये प्रामुख्याने ३३ अनारसे ठेवून वाण दिले जाते. आता एवढे अनारसे द्यायचे नसतील तर तुम्ही ३३ बत्तासे ठेवून त्याचेही वाण देऊ शकता.
अनारसे, बत्तासे किंवा इतर कोणताही पदार्थ ३३ वेळा देण्यापेक्षा वेगवेगळ्या प्रकारचे लाडू, करंजी, चिक्की असे वेगवेगळे गोड पदार्थ मिळून ३३ असेही देऊ शकता.
सुकामेव्याचे वाणही देऊ शकता. यापैकी अंजीर, मनुका, खजूर असे गोड पदार्थ द्या. किंवा बदाम, काजू, पिस्ता, अक्रोड असं सगळंच ३३ वेळा द्या. असं आरोग्यदायी वाण कोणालाही आवडेलच...
किंवा नुसताच सुकामेवा देण्याऐवजी तो सगळा एकत्र करा आणि त्याचे ३३ लाडू करून ते वाण म्हणून द्या.
'या' जादुई पाण्याने रोज गुळण्या करा- दातांवरचा पिवळट थर जाऊन मोत्यांसारखे चमकतील
हल्ली बरेच जण हेल्थ कॉन्शस झालेले आहेत. त्यामुळे जावयाला तिळाची चिक्की, दाण्यांची चिक्की, फुटाण्यांची चिक्की, मुरमुऱ्यांची चिक्की, मखाना चिक्की असे गूळ घालून केलेल्या चिक्कीचे वेगवेगळे प्रकारही देऊ शकता. त्यात साखर घालणं टाळा.
वेगवेगळ्या प्रकारची ३३ फळं एकत्र करा आणि ती देखील वाण म्हणून द्या. फळांचे वाणही उत्तम वाण ठरू शकते.
Web Summary : During Adhik Maas, gifting the son-in-law is important. Offer traditional sweets like 33 Anarase or Laddus. Healthy options include dry fruits or jaggery-based chikkis. Fruits can also be gifted, signifying health and prosperity.
Web Summary : अधिक मास में दामाद को उपहार देना महत्वपूर्ण है। 33 अनरसे या लड्डू जैसे पारंपरिक मिठाईयाँ दें। स्वस्थ विकल्पों में सूखे मेवे या गुड़ की चिक्की शामिल हैं। फल भी उपहार में दिए जा सकते हैं, जो स्वास्थ्य और समृद्धि का प्रतीक हैं।