अधिक महिन्याला आता लवकरच सुरुवात होत आहे. अधिकाच्या महिन्याला आपल्याकडे खूप महत्त्व आहे. धोंड्याचा महिना म्हणूनही अधिक मास ओळखला जातो. तसेच पुरुषोत्तम मास असंही त्याला म्हटलं जातं. या महिन्याच्या अनेक परंपरा आहेत. जसं की जावयाला अनारसे किंवा बत्तासे यांचे वाण देणे, दिप दान करणे.. या परंपरांसोबतच आणखी एक परंपरा म्हणजे या महिन्यात काही खास रांगोळ्याही काढल्या जातात. हल्ली सणानुसार किंवा लग्न, हळद, केळवण अशा कार्यक्रमांनुसार त्या त्या थीमच्या रांगोळ्या आपण काढतोच.. याचंच पारंपरिक रूप म्हणजे अधिक मासानिमित्त काढण्यात येणाऱ्या काही खास रांगोळ्या. या रांगोळ्या घरोघरीच्या महिला देवासमोर काढतात. त्या नेमक्या कशा आहेत ते पाहुया...(Adhik Maas Special Rangoli)
अधिक मासानिमित्त काढण्यात येणाऱ्या पारंपरिक रांगोळ्या
१. गो पद्म रांगोळी
गोपद्म रांगोळी यावरूनच लक्षात येतं की या रांगोळीमध्ये गो पद्म काढण्यात येतं. पण ते एका विशिष्ट पद्धतीने ठराविक रचनेमध्ये असतं. यामध्ये सगळ्यात वर एक गो पद्म काढण्यात येतं.
उन्हामुळे रापलेल्या त्वचेला द्या राईस वॉटरचा थंडावा- बघा टॅनिंग कमी करण्याचा खास उपाय
त्यानंतर त्याच्या खाली दोन, तीन, चार याप्रमाणे प्रत्येक ओळीत एकेक गो पद्म वाढवलं जातं. सगळ्यात खालच्या थरामध्ये ७ गोपद्म काढायची. अगदी सोपी असणारी ही रांगोळी काही घरांत महिनाभर काढली जाते.
२. पुरुषोत्तम रांगोळी
अधिक मासाला पुरुषोत्तम मास म्हणतात हे आपल्याला माहितीच आहे. त्यानुसार या महिन्यात अशा पद्धतीची रांगोळी काढली जाते आणि तिला पुरुषोत्तम रांगोळी असं म्हणतात.
अधिक मासात जावयाला देण्यासाठी नव्या पद्धतीच्या सुंदर निरांजन, पाहा एकाहून एक देखणे ९ दिवे
या रांगोळीमध्ये मध्यभागी विष्णू असतात आणि त्यांच्या आजुबाजुला त्यांच्या प्रिय गाेष्टी रांगोळीतून दाखवल्या जातात. या रांगोळीचा छापा तुम्ही ऑनलाईन शॉपिंग साईटवरूनही मागवू शकता. किंवा तुमच्या शहरातल्या स्थानिक बाजारपेठेतही तो मिळू शकतो.
Web Summary : Adhik Maas, also known as Purushottam Maas, is a month of traditions. Women create special Rangoli designs in front of deities. Two popular designs are Go Padam and Purushottam Rangoli, each with unique patterns and significance.
Web Summary : अधिक मास, जिसे पुरुषोत्तम मास भी कहा जाता है, परंपराओं का महीना है। महिलाएं देवताओं के सामने विशेष रंगोली डिजाइन बनाती हैं। दो लोकप्रिय डिजाइन हैं गो पद्म और पुरुषोत्तम रंगोली, प्रत्येक अद्वितीय पैटर्न और महत्व के साथ।