lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > लेकीसाठी त्यानं स्वत:ला बदललं! इमरान खान राहतो छोट्याशा प्लॅटमध्ये, बंगला-गाडी विकली कारण..

लेकीसाठी त्यानं स्वत:ला बदललं! इमरान खान राहतो छोट्याशा प्लॅटमध्ये, बंगला-गाडी विकली कारण..

Viral News about Imran Khan's bad patch: कधीकाही अलिशान बंगल्यात राहणारा अभिनेता इमरान खान आता अगदीच मोजक्या सामानासह एका लहानशा फ्लॅटमध्ये राहतो आहे. बघा का आली त्याच्यावर ही वाईट वेळ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2024 01:21 PM2024-02-08T13:21:21+5:302024-02-08T13:38:10+5:30

Viral News about Imran Khan's bad patch: कधीकाही अलिशान बंगल्यात राहणारा अभिनेता इमरान खान आता अगदीच मोजक्या सामानासह एका लहानशा फ्लॅटमध्ये राहतो आहे. बघा का आली त्याच्यावर ही वाईट वेळ...

Actor Imran Khan revealed about his low phase in 2016 and bad patch in his life | लेकीसाठी त्यानं स्वत:ला बदललं! इमरान खान राहतो छोट्याशा प्लॅटमध्ये, बंगला-गाडी विकली कारण..

लेकीसाठी त्यानं स्वत:ला बदललं! इमरान खान राहतो छोट्याशा प्लॅटमध्ये, बंगला-गाडी विकली कारण..

Highlightsयादरम्यानच तो एका मुलीचा पिता झाला आणि तिच्यासाठी आपण एक उत्तम 'बाप' ठरावं, म्हणून त्याने स्वत:मध्ये अनेक बदल केले.

अभिनेता इमरान खान म्हटलं की अनेकांना आठवतो तो "कभी कभी अदिती जिंदगी मे युही कोई....." या गाण्यातला तरुण, उमदा नायक. "जाने तु या जाने ना" या चित्रपटातली त्याची भूमिका खूपच गाजली. यानंतर त्याने काही मोजकेच चित्रपट केले आणि त्यानंतर तो बॉलीवूडमध्ये दिसेनासा झाला. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी अभिनेता अमिर खानच्या (Aamir Khan) लेकीच्या म्हणजेच इरा खानच्या (Ira Khan) लग्नात तो दिसला आणि तेव्हापासून त्याची चर्चा सुरू झाली. सध्या त्याची आर्थिक परिस्थिती फार काही बरी नसून तो एका लहानशा फ्लॅटमध्ये खूपच मोजक्या सामानासह राहतो आहे. पैशांसाठी त्याला त्याची फेरारी कार आणि पाली हिल्सयेथील अलिशान बंगलाही विकावा लागला, अशी चर्चा आहे. (Viral News about Imraan Khan's bad patch)

 

यासंदर्भातली इमरान विषयीची बरीचशी माहिती instantbollywood या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. यामध्ये असं म्हटलं आहे की Vogue ला दिलेल्या एका मुलाखतीत इम्रान खानने स्वत:च त्याच्या या बदलत्या परिस्थितीविषयी माहिती दिली.

अभिनेत्री भाग्यश्रीने सांगितली मुगडाळ खिचडी करण्याची हटके रेसिपी- बघा तिचा व्हायरल व्हिडिओ 

मुलाखतीदरम्यान तो म्हणाला की २०१६ पासून त्याची आर्थिक परिस्थिती झपाट्याने बदलून गेली. सुरुवातीला त्याला बॉलीवूडमध्ये काम होते. पण त्यानंतर तो या सगळ्यापासून दूर झाला. यादरम्यानच तो एका मुलीचा पिता झाला आणि तिच्यासाठी आपण एक उत्तम बाप ठरावं, म्हणून त्याने स्वत:मध्ये अनेक बदल केले.

 

दरम्यान या काळातच तो आणि त्याची पत्नी अवंतिका मलिक हे दोघेही वेगळे झाले. इम्रानला आर्थिक परिस्थितीमुळे त्याचा राहता बंगला आणि फेरारी गाडीही विकावी लागली.

ऋतू बदलामुळे त्वचा कोरडी झाली? गुलाबपाण्याचा 'असा' वापर करा, त्वचेसाठी ठरेल वरदान

सध्या अगदीच मोजकी भांडी आणि सामान घेऊन तो बांद्रा येथे एका फ्लॅटमध्ये राहात असून आता त्याच्याकडे लहान गाडी आहे. इरा खानच्या लग्नातही त्याने घातलेले कपडे १० वर्षे जुनेच होते, अशी चर्चा आहे. इमरान खान आता बॉलीवूडमध्ये लवकरच कम बॅक करणार आहे. त्याच्याविषयीच्या या सगळ्या गोष्टींमध्ये काहीच तथ्य नसून हे सगळे चित्रपटाच्या अनुशंगाने होत असलेले पब्लिसिटी स्टंट आहेत, असंही बऱ्याच जणांना वाटत आहे. 

 

Web Title: Actor Imran Khan revealed about his low phase in 2016 and bad patch in his life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.