'माझं ना हल्ली डोकंच चालत नाही...', 'डोकं खूप जड पडलंय...', 'गोष्टी डोक्यातच राहात नाहीत, लगेच विसरून जातात..' अशा डोक्यासंबंधीच्या गोष्टी आपण नेहमीच ऐकत असतो किंवा स्वत: बोलत असतो. आता वर वर पाहिलं तर महिलांचा मेंदू आणि पुरुषांचा मेंदू सारखाच आहे. पण तरीही दोघांच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये बदल असतो. एक सर्वसाधारण बाब अशी की महिलांच्या डोक्यात एकाचवेळी शंभर गोष्टी चालू असतात तर पुरुषांचं एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित असतं. याचाही परिणाम त्यांच्या स्मरणशक्तीवर होतोच.. याचविषयी लखनौ येथील KGMU आणि PGI या संस्थांनी एक अभ्यास केला असून त्यातून रंजक माहिती समोर आली आहे.
काही अपवाद सोडले तर असं दिसून येतं की महिलांना अगदी लहानसहान गोष्टी पक्क्या ठावून असतात. सगळ्यांच्या जन्मतारखा, लग्नाचे वाढदिवसही त्या लक्षात ठेवतात. पण त्याउलट मात्र पुरुष स्वता:च्या लग्नाची तारीखही विसरून जातात.
तळपायांना सतत क्रिम चोपडलं तरी भेगा जशाच्या तशा, हे पदार्थ खा- पाहा भेगा पडण्याचं मुख्य गंभीर कारण
पण त्याचवेळी त्यांच्या कामाच्या बाबतीत मात्र ते अगदी चोख असतात. मग असं असताना महिलांची स्मरणशक्ती चांगली की पुरुषांची चांगली हे जाणून घेण्यासाठी त्या संस्थेने एक अभ्यास केला. त्यात असं दिसून आलं की महिलांमध्ये गोष्टी विसरण्याचं प्रमाण पुरुषांच्या तुलनेत जास्त आहे.
ज्यांचा अभ्यास केला त्या १०० पुरुषांपैकी १३ पुरुष गोष्टी विसरून गेले तर महिलांच्या बाबतीत हा आकडा ३९ होता. अभ्यासानुसार असं समोर आलं की महिलांच्या डोक्यात एकाचवेळी कित्येक गोष्टी चाललेल्या असतात.
विसराळूपणा वाढला, कामं लक्षातच राहात नाहीत? १ आयडिया करून पाहा, झटपट कामं होतील
त्यामुळे त्यांचा फोकस कमी पडतो. शिवाय स्वत:ची काळजी न घेणे, वेळेवर न खाणे, व्यायाम न करणे ही कारणंही विस्मरणासाठी कारणीभूत आहेत. ज्या महिलांच्या आयुष्यात एकाकीपणा आहे, त्यांच्यामध्ये विसरण्याचं प्रमाण जास्त आहे.
