घराची साफसफाई करणं जितकं कठीण वाटत नाही तितकं पंखा स्वच्छ करण्याचं काम अवघड वाटतं. खासकरून सिलिंग फॅन स्वच्छ करायचा म्हटला की डोकेदुखी वाटते. पंखा उंचावर असल्यामुळे पंखा साफ करताना पंख्याची घाण सर्वत्र उडते तसंच हात पुरत नसल्यामुळे अनेकदा स्टूलवर चढून पंखा पुसताना संतुलन बिघडण्याचाही धोका असतो. पंखा साफ करण्याचं काम बरेचजण टाळत असतात. (How To Clean Fan Easily)
सततच्या वापरामुळे पंख्यावर धुळीचा थर तयार झालेला असतो. ज्यामुळे त्यावर काळे डागही पडतात. जर तुम्हालासुद्धा हीच समस्या असेल तर तुम्हाला काळजी करण्याचं काहीच कारण नाही. एक सोपी, स्मार्ट ट्रिक वापरून तुम्ही शिडीवर न चढता उभ्या उभ्या पंखा स्वच्छ करू शकता. (Easy Way To Clean Fan)
सोशल मीडियावर व्हायरल झाली सोपी ट्रिक (A special trick to clean a fan without A Ladder)
आजकाल सोशल मीडियावर एका महिलेनं शेअर केलेला जुगाड व्हायरल होत आहे. या ट्रिकची खासियत अशी की यासाठी तुम्हाला महागडी उपकरणं वापरावी लागणार नाहीत. फक्त एक जुनं कापड, काही रबर बॅण्ड आणि एक काठी लागेल. या साहित्याच्या मदतीनं तुम्ही स्वत:च फॅन क्लीन करू शकता. सगळ्यात आधी एक जुनं कापड घ्या. एका काठीला एक कापड बांधा आणि हे कापड दोन भागांत वेगळे करा. नंतर दोन्ही भागांना रबरबॅण्ड लावा.
पंख्याचे ब्लेड्स कसे स्वच्छ करावेत?
जेव्हा तुम्ही होममेड फॅन क्लिनर तयार कराल तेव्हा ते वर उचला आणि पंख्याचे ब्लेड स्वच्छ करा. या सोप्या पद्धतीमुळे कमीत कमी वेळात पंखा स्वच्छ करण्याचं काम होईल. पंखा स्वच्छ करण्यासाठी धूळ काढून टाकणं खूप गरजेचं आहे. आधी कोरडं कापड ब्लेड्सच्या पुढे-मागे लावा. यामुळे धुळीचे मोठे थर सहज निघून जातील नंतर मग ओल्या कापडानं पंख्याचे ब्लेड्स स्वच्छ करा. यामुळे खाली कमी घाण होईल. ही छोटी स्टेप तुमचं काम सोपं करेल.
ओल्या कापडानं पुसल्यानंतर चमकदार फिनिशिंग मिळेल?
धूळ हटवल्यानंतर पंखा चमकवण्यासाठी तुम्ही एका स्प्रे बॉटलमध्ये पाणी, व्हिनेगर आणि डिश सोप मिसळा. हे मिश्रण कापडावर शिंपडून नंतर ब्लेड्स स्वच्छ करा. यामुळे घाण निघून जाण्यास मदत होईल आणि पंखे चमकदार होतील.
पंखा व्यवस्थित साफ झाल्यानंतर कापड व्यवस्थित धुवून सुकवून घ्या. जेणेकरून पुन्हा वापरण्यास काहीही त्रास होणार नाही. महिन्यातून एकदा या पद्धतीनं तुम्ही पंखा स्वच्छ करू शकता. ज्यामुळे पंख्यावर धूळ जमा होणार नाही तसंच घर स्वच्छ होईल, घरात हवासुद्धा खेळती राहील.
