Lokmat Sakhi >Social Viral > उन्हाळ्यात घरामध्ये लाल मुंग्यांचा उच्छाद? करा १ सोपा उपाय, मिनिटभरात मुंग्या होतील गायब...

उन्हाळ्यात घरामध्ये लाल मुंग्यांचा उच्छाद? करा १ सोपा उपाय, मिनिटभरात मुंग्या होतील गायब...

A Natural Way to Get Rid of Red Ants in Your House : How to Stop Red Ants from Coming Inside Your House : Here's How to Get Rid of Red Ants Permanently in Your House : घराच्या कानाकोपऱ्यांत फिरणाऱ्या लाल मुंग्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी करा हा घरगुती उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2025 12:56 IST2025-03-28T12:44:22+5:302025-03-28T12:56:14+5:30

A Natural Way to Get Rid of Red Ants in Your House : How to Stop Red Ants from Coming Inside Your House : Here's How to Get Rid of Red Ants Permanently in Your House : घराच्या कानाकोपऱ्यांत फिरणाऱ्या लाल मुंग्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी करा हा घरगुती उपाय...

A Natural Way to Get Rid of Red Ants in Your House How to Stop Red Ants from Coming Inside Your House | उन्हाळ्यात घरामध्ये लाल मुंग्यांचा उच्छाद? करा १ सोपा उपाय, मिनिटभरात मुंग्या होतील गायब...

उन्हाळ्यात घरामध्ये लाल मुंग्यांचा उच्छाद? करा १ सोपा उपाय, मिनिटभरात मुंग्या होतील गायब...

आपल्यापैकी बऱ्याचजणांच्या घरात मुंग्यां घरभर फिरताना दिसतात. एवढंच नव्हे तर काहीवेळा किचनमधील ओट्यावर काही पदार्थ ठेवले तर त्यावरही या मुंग्या हल्लाबोल करतात. घरभर या मुंग्यांचा उच्छाद पाहिला (How to Stop Red Ants from Coming Inside Your House) की नकोसे वाटते. या मुंग्यांमध्येही लाल मुंग्या (A Natural Way to Get Rid of Red Ants in Your House) म्हणजे भीती वाटते कारण या लाल मुंग्या एकदा अंगावर चढल्या की कडकडून चावा घेतात. अशा या लाल मुंग्यांची घरातील दहशत पाहून आपण त्यांना घालवण्यासाठी अनेक उपाय करतो(How to Get Rid of Red Ants Permanently in Your House).

मुंग्यांना घालवण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे स्प्रे,खडू, गोळ्या असे असंख्य उपाय करतो. परंतु काहीवेळा या मुंग्यांपासून पिच्छा सोडवणे कठीण होते. या मुंग्यांना कितीही घालवण्याचा प्रयत्न केला तरीही त्या परत येतातच. यासाठी घरातील लाल मुंग्यांना जर पळवून लावायचे असेल तर एक घरगुती खास उपाय नक्की करून पाहा. हा खास उपाय केल्याने घरातील लाल मुंग्या चुटकीसरशी घराबाहेर निघून जातील. घरातील लाला मुंग्यांना घालवण्यासाठी नेमक करायचं काय ते पाहूयात. 

साहित्य :-

१. हिंग - १ टेबलस्पून 
२. पाणी - १/२ ग्लास 
३. डेटॉल - १ टेबलस्पून 

फक्त वाटीभर पॉपकॉर्न करतील उंदरांचा बंदोबस्त, करा 'हा' उपाय - घरातील उंदरांचा उपद्रव कायमचा थांबेल!


पेस्ट कंट्रोलने कमी न होणारी झुरळंही जातील कायमची घराबाहेर, १ वाटी तुळशीच्या पानांचा खास उपाय...

कृती :- 

१. सगळ्यांत आधी एका ग्लासात पाणी घेऊन त्यात प्रत्येकी १ टेबलस्पून हिंग आणि डेटॉल टाकावे. 
२. त्यानंतर चमच्याने हलवून हे सगळे मिश्रण एकजीव करून घ्यावे. 

३. आता हे तयार मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये भरून स्टोअर करून ठेवावे. 
४. ज्या भागात लाल मुंग्या असतील त्या भागात स्प्रे बॉटलमधील द्रावणाची फवारणी करून घ्यावी. 

हा घरगुती साधासोपा उपाय केल्यास घरातील लाल मुंग्याचे प्रमाण कमी होऊ शकते. हा उपाय करायला अतिशय सोपा आणि कमीत कमी खर्चात होणारा असल्याने घरातील मुंग्यांना पळवून लावण्यासाठी आपण हा उपाय नक्कीच करू शकतो. 

Web Title: A Natural Way to Get Rid of Red Ants in Your House How to Stop Red Ants from Coming Inside Your House

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.