Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > कुलरसारखी थंड हवा पंखाही देईल फक्त करा या ३ गोष्टी, उन्हाळ्यात मिळेल थंडगार हवा

कुलरसारखी थंड हवा पंखाही देईल फक्त करा या ३ गोष्टी, उन्हाळ्यात मिळेल थंडगार हवा

A fan will also provide cool air like a cooler. Just do these 3 things : पंखा देईल जास्त गार हवा, पाहा का करावे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2026 13:25 IST2026-04-05T13:23:21+5:302026-04-05T13:25:34+5:30

A fan will also provide cool air like a cooler. Just do these 3 things : पंखा देईल जास्त गार हवा, पाहा का करावे.

A fan will also provide cool air like a cooler. Just do these 3 things | कुलरसारखी थंड हवा पंखाही देईल फक्त करा या ३ गोष्टी, उन्हाळ्यात मिळेल थंडगार हवा

कुलरसारखी थंड हवा पंखाही देईल फक्त करा या ३ गोष्टी, उन्हाळ्यात मिळेल थंडगार हवा

उन्हाळ्यात पंखा हा प्रत्येक घरातील सर्वात जास्त वापरला जाणारा साथीदार असतो. पण अनेकदा असे होते की पंखा सुरू असतानाही हवा थंड वाटत नाही, उलट गरमच हवा फिरत असल्यासारखे वाटते. (A fan will also provide cool air like a cooler. Just do these 3 things)अशावेळी नवीन उपकरण घेण्यापेक्षा काही सोपे आणि घरगुती उपाय करुन थंड वारा मिळता येतो.

सर्वात आधी लक्ष द्यायची गोष्ट म्हणजे पंख्याची स्वच्छता. पंख्याच्या पातींवर धूळ साचलेली असेल, तर ती हवा योग्य प्रकारे देत नाही. त्यामुळे पंख्याची गती जरी जास्त असली तरी हवा कमी आणि गरम जाणवते. म्हणूनच आठवड्यातून किमान एकदा पंख्याच्या पाती स्वच्छ करणे गरजेचे आहे. पंखा बंद करून, कोरड्या कापडाने किंवा हलक्या ओल्या कापडाने पाती नीट पुसल्यास हवा लगेचच हलकी आणि ताजी वाटू लागते.

घरातील लादी (फ्लोअर) स्वच्छ ठेवणे आणि थोड्या थंड पाण्याने पुसणे हा देखील खूप प्रभावी उपाय आहे. थंड पाण्याने लादी पुसल्यामुळे घरातील तापमान काही प्रमाणात कमी होते आणि त्यावरून फिरणारी हवा अधिक थंड वाटते. हा साधा उपाय दिवसभरात एक-दोन वेळा केला तरी फरक जाणवतो. खिडक्या आणि दरवाज्यांचा योग्य वापर करणेही महत्त्वाचे आहे. सकाळी आणि संध्याकाळी बाहेरची हवा थोडी थंड असते, त्यामुळे त्या वेळी खिडक्या उघडून हवा खेळती ठेवावी. मात्र दुपारच्या कडक उन्हात खिडक्या बंद ठेवून पडदे लावल्यास घरात उष्णता कमी शिरते.

पंख्यासमोर थंड पाण्याने भरलेले भांडे किंवा बर्फ ठेवण्याची जुनी पद्धतही उपयोगी ठरते. पंख्याने त्या पाण्यावरून जाणारी हवा थोडी थंड होऊन खोलीत पसरते. तसेच ओले कापड खिडकीला लावल्यास त्यातून येणारी हवा अधिक गार वाटते. घरात जाड, गडद रंगाचे पडदे किंवा कार्पेट्स असल्यास ते उष्णता धरून ठेवतात. उन्हाळ्यात फिकट रंगांचे आणि हलक्या कापडाचे पडदे वापरल्यास घरातला उकाडा कमी होतो. तसेच शक्यतो इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर कमी करावा, कारण तीही उष्णता वाढवतात.

Web Title : पंखा देगा कूलर जैसी हवा: गर्मी में राहत के 3 आसान उपाय

Web Summary : पंखा साफ करें, ठंडे पानी से फर्श धोएं और खिड़कियों का सही उपयोग करें। पंखे के सामने पानी रखें और हल्के पर्दे इस्तेमाल करें, गर्मी कम होगी और पंखे से कूलर जैसी हवा मिलेगी।

Web Title : Cooler-like air from your fan: 3 tips for summer comfort.

Web Summary : Get cooler air from your fan this summer by cleaning it, mopping floors with cold water, and optimizing window use. Place water in front of the fan and use light curtains to reduce heat.