Join us

छेड काढणाऱ्या दारुड्याला महिलेने चपलेने मारले, घडवली अद्दल.. व्हायरल व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2023 20:00 IST

Social Viral Video कर्नाटकात एका महिलेने भर रस्त्यात एका व्यक्तीला बेदम चोप दिला. तिचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. महिलांकडे आता स्वतःचे संरक्षण करण्याची क्षमता आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलंच असेल, कशा महिला आपले ध्येय गाठत आहे. छेड काढणाऱ्यांचे मुसक्या आवळत आहे. यासह त्यांना आपला इंगा देखील दाखवत आहे.

असाच एका प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ज्यात एक महिला छेड काढणाऱ्या मद्यधुंद व्यक्तीला चप्पलेने मारत आहे. या दरम्यान, काहींनी या घटनेचा व्हिडिओ शूट केला, आणि सोशल मीडियावर व्हायरल केला.

हा व्हायरल व्हिडिओ आहे कर्नाटकच्या धारवाड जिल्ह्यातील एका गावातील. ज्यात एका महिलेने गैरवर्तन केल्याप्रकरणी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका व्यक्तीला चप्पलने मारहाण केली आहे. तो व्यक्ती रस्त्यावर बसला असून, तिने त्याच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर चप्पल मारली आहे. त्याने रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांना मोबाईल नंबर मागून छेड काढली. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, अनेकांनी कमेंट करत महीलेचं कौतुक केलं आहे.

टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरलकर्नाटक