सध्याच्या धावपळीच्या युगात मोबाईल हा मुलांचा जणू खेळणारा पार्टनर झाला आहे. जेवताना घास भरवण्यासाठी असो किंवा मुलांनी त्रास देऊ नये म्हणून त्यांना शांत बसवण्यासाठी पालक स्वत:च त्यांच्या हातात स्मार्टफोन देतात. सुरुवातीला मनोरंजनाचे साधव वाटणारा हा फोन कधी मुलांचे व्यसन बनतो हे कोणाच्याही लक्षात येत नाही. (TikTok dangerous trends)
सध्याची मुले तासंतास सोशल मीडियावर रील्स पाहतात, शॉर्ट व्हिडीओजमध्ये हरवलेली असतात. फोन मिळाला नाही तर ही मुले आक्रमक होतात, रडतात, जेवण नाकारतात आणि टोकाचा हट्ट करतात. पण या आभासी जगामुळे त्यांच्याकडून अनेकदा चूक घडते.(Child eye injury) रील्समधील झगमगाट, स्टंट्स आणि नवनवीन 'हॅक्स' पाहून मुले घरीच तसे जीवघेणे प्रयोग करायला लागतात.(Viral toy hack accident) व्हिडिओमध्ये हे सोपं दिसतंय, मग आपणही करून पाहूया, ही कुतूहलापोटी निर्माण झालेली भावना कधीकधी आयुष्यभराचे दुःख देऊन जाते. सोशल मीडियावरील लाईक्स आणि व्ह्यूजच्या शर्यतीत ही निष्पाप मुले आपल्या जिवाशी खेळतात. हे वास्तव एका ९ वर्षांच्या मुलासोबत घडलेल्या भीषण घटनेने जगासमोर आणले आहे.
रोज फक्त १० मिनिटं करा 'ही' मुद्रा; वाढलेला बीपी-छळणारा स्ट्रेस कमी करणारा एक उपाय
शिकागोमधील एका ९ वर्षांच्या मुलाशी संबंधित धक्कादायक प्रकार घडला. मुलाने टिकटॉकवर एक टॉय हॅक पाहिला.९ वर्षांचा कालेब चाबोला हा आपल्या मित्राने सांगितलेल्या एका जुन्या 'टिकटॉक ट्रेंड'ला बळी पडला आणि एका क्षणात त्याचे आयुष्य बदलले. या घटनेने जगभरातील पालकांचे डोळे उघडले आहेत. कालेबकडे 'नीडोह नाइस क्यूब' नावाचे एक सेन्सरी खेळणे होते. हे खेळणे अधिक लवचिक आणि मऊ व्हावे, यासाठी त्याच्या एका मित्राने त्याला एक आयडिया दिली. मित्राने सांगितले की, जर हे खेळणे मायक्रोवेव्हमध्ये गरम केले, तर ते अधिक लवचिक होते हा एक जुना व्हायरल टिकटॉक ट्रेंड होता.
मित्राच्या सांगण्यावर विश्वास ठेवून कालेबने शिकागो येथील आपल्या घरी ते खेळणे मायक्रोवेव्हमध्ये गरम करण्यासाठी ठेवले. मात्र थोड्याच वेळात भयानक दुर्घटना घडली. या खेळण्याचा बाहेरील भाग जरी बिगर विषारी सिलिकॉन पासून बनलेला असला, तरी त्याच्या आत डिंकासारखा एक चिकट पदार्थ असतो. मायक्रोवेव्हमधील उष्णतेमुळे या अंतर्गत पदार्थाचे प्रसरण होऊ लागले आणि आतमध्ये प्रचंड दाब निर्माण झाला. कालेबने जेव्हा मायक्रोवेव्हचा दरवाजा उघडला, तेव्हा ते खेळणे दबावामुळे थेट त्याच्या चेहऱ्यावर फुटले.
कालेबची आई, व्हिटनी ग्रब यांनी सांगितले की, त्याच्या चेहऱ्याची उजवी बाजू अक्षरशः वितळत होती. त्याचे हात आणि चेहरा 'सेकंड डिग्री' भाजले होते. लोयोला युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरमध्ये उपचार सुरू असताना डॉक्टरांना त्याची मृत त्वचा शस्त्रक्रिया करून काढून टाकावी लागली. त्वचेच्या प्रत्यारोपणाची गरज पडली नाही, तरीही त्याच्या चेहऱ्यावर आयुष्यभरासाठी व्रण राहण्याची दाट शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे.
पालकांनी देखील काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. मुले जेव्हा सतत फोन पाहतात, तेव्हा त्यांच्या मेंदूमध्ये डोपामाइन नावाचे रसायन तयार होते, ज्यामुळे त्यांना स्क्रीनचे वेड लागते. फोन पाहिल्यानंतर मुले अनेकदा अस्वस्थ होतात किंवा नस्ते उपद्रव करायला लागतात. व्हिडिओमध्ये पाहिलेल्या गोष्टींची नक्कल करणे, उंचावरून उड्या मारणे किंवा धोकादायक वस्तूंसोबत खेळणे यांसारखे प्रकार मुले करू लागतात. पालकांकडे दुर्लक्ष करून ते केवळ स्क्रीनमध्ये गुंतलेले राहिल्यामुळे त्यांच्यातील सामाजिक आणि भावनिक विकासही कमी होतो.
