Join us

९ महिने प्रेग्नंट महिलेचा जिममध्ये भलताच स्टंटबाज व्यायाम, व्हायरल व्हिडिओ पाहून सगळेच हैराण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2022 15:51 IST

Viral Video गरोदरपणात व्यायाम तब्येतीला जपून डॉक्टरांच्या सल्ल्यानं करावा, मात्र इथं ही महिला भलताच डेअरिंगबाज व्यायाम करतेय..

गरोदरपणात हलका व्यायाम करणं, चालायला जाणं, योगासनं हे सारं तर अनेकजणी करतात. मात्र पहिल्या तीन महिन्यात आणि शेवटच्या तीन महिन्यात अत्यंत काळजीपूर्वक डॉक्टरचा सल्ला घेत व्यायाम आणि शारीरिक हालचाली केल्या जातात. आठव्या अथवा नवव्या महिन्यात व्यायाम करण्याचं प्रमाणही कमी होतं. परंतु, नवव्या महिन्यात, दिवस भरत आलेले असताना कुणा गर्भवती महिलेला व्यायाम करताना पाहिलंय का? सध्या सोशल मीडियात असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एक ९ महिन्यांची गर्भवती महिला जिममध्ये व्यायाम करताना दिसतेय, असे करावे की नाही याविषयी अर्थातच व्हायरल चर्चा आहे.

व्हिडिओमधील महिला चक्क व्यायाम शाळेत जाऊन व्यायाम करतेय. तिने सुरुवातीला आपले बेबी बंप दाखवले. त्यानंतर दोन्ही पाय हवेत आणि दोन्ही हात जमिनीवर ठेवून ही महिला बॅलन्स करत उभी राहिली. हा व्हिडीओ पाहून भल्याभल्यांना घाम फुटला आहे. नवव्या महिन्यात देखील इतकी एनर्जी, यासह अगदी सहजपणे तिने ही गोष्ट केलीच कशी असा प्रश्न आता नेटकरी विचारू लागले आहेत.

व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने म्हटले, ‘असे असू शकते की पोटाच्या आत बाळाच्या अवयवांना आणि मानेभोवती नाळ गुंडाळलेली असावी'. अनेक महिलांनी तिला स्वतःची काळजी घ्यायला सांगितली, 'गर्भवती असताना असे काही करू नये' असाही सल्ला त्यांनी दिला. 'असे व्यायाम करताना काळजी घ्या' असे काहींनी म्हटलं आहे. ही गोष्ट योग्य की अयोग्य. हे सगळे सोशल मीडियाचे नवे फॅड, याविषयी अर्थातच बरीच मतंमतांतरं आहेत.

टॅग्स :महिलागर्भवती महिलासोशल व्हायरलसोशल मीडिया