शाळकरी मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळ्यांच्या हातात आता सोशल मीडिया आलेला आहेत... त्यामुळे या ठिकाणी जे काही येतं आणि त्यातलं जे नवं वाटतं ते हातोहात सगळीकडे पसरतं आणि प्रचंड व्हायरल होऊन जातं. असंच काही दिवसांपुर्वी सोशल मीडियावर नॅशनल क्रश म्हणून ओळखल्या गेलेल्या गिरीजा ओकचा बोलबाला होता. आता पुन्हा एक नवं वादळ सोशल मीडियावर येऊन धडकलं आहे आणि त्या वादळाचं नाव आहे सीमा आनंद. ६३ वर्षांच्या सीमा आनंदची चर्चा अगदी जेन झी पासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळ्याच गटांमध्ये सध्या होत आहे..
कोण आहेत सीमा आनंद?
सुंदर साडी, कपाळावर मोठी टिकली, मोकळे सोडलेले पांढरे केस आणि खूपच मधूर आवाज अशा रुपात व्हायरल झालेल्या सीमा आनंद या प्रसिद्ध स्टोरीटेलर आहेत. मायथोलॉजिस्ट आणि रिलेशनशिप एक्सपर्ट म्हणूनही त्या ओळखल्या जातात.
सिंक-वॉशरूमसह घरातून येणारी दुर्गंधी चटकन होईल गायब- ५ सोपे उपाय, घरात वाटेल प्रसन्न
‘The Arts Of Seduction’ या नावाचं त्यांचं एक पुस्तकही प्रकाशित झालेलं असून फिजिकल रिलेशन्स याबाबतीत त्या खूप मोकळेपणाने बोलतात. जुन्या पौराणिक कथा त्या नव्या रुपात आणि अधुनिक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतात. अशा पद्धतीने त्या विषयांची मांडणी करतात की लोकांना ते खूप जास्त आवडून जातं. त्यामुळेच तर सोशल मीडियावरही त्यांचे प्रचंड फॉलोअर्स झालेले आहेत.
आता पुन्हा एकदा त्या नव्याने चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे त्यांचा एक पॉडकास्ट नुकताच प्रसिद्ध झाला. यामध्ये त्यांनी सांगितलं की एका मुलाने नुकतंच त्यांच्या सौंदर्याचं खूप कौतूक केलं आणि नंतर त्यांना प्रपोज केलं. तो मुलगा फक्त १५ वर्षांचा होता आणि सीमा यांचं वय मात्र ६२ वर्षांचं होतं.
आईने मारलेला परफ्यूम मुलांसाठी ठरतोय घातक, मुलांना होऊ शकतो 'हा' भयानक त्रास
त्यांची अशीच काही विधानं सोशल मीडियावर नेहमीच गाजत असतात. कोणत्याही विषयावर त्या खूप बोल्ड विधानं देतात त्यामुळेच तर अगदी जेन झी पासून ते प्रौढांपर्यंत सगळ्याच गटात त्यांची चर्चा असते.
