Join us  

पावसाळ्यात घरात ट्यूबभोवती पाकोळ्या-किडे भिरभिरतात? ५ उपाय, किड्यांना न मारता ठेवा घराबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2023 6:02 PM

5 ways to get rid of bugs during rainy season पाऊस येण्याची वर्दी घेऊन येणाऱ्या पाकोळ्या, किडे त्यांना घरात येतात म्हणून मारु नका, घरात न येऊ देण्यासाठी सुरक्षित उपाय

पावसाळा आवडतो पण पावसासोबत येणाऱ्या काही गोष्टींचा त्रासही होतो. यातील एक म्हणजे पावसाळ्यात किड्यांचा प्रादुर्भाव खूप वाढतो. अशा स्थितीत प्रकाशाभोवती भिरभिरणारे किडे, माश्या घरभर फिरतात. लाइट लागली की तिथे एक-दोन नाही तर शेकडो किडे येतात. त्यांना मारणंही योग्य वाटत नाही अशावेळी काय करावं?(5 ways to get rid of bugs during rainy season).

संध्याकाळी खिडक्या आणि दरवाजे बंद करा

संध्याकाळी दिवे लावण्यापूर्वी घरातील खिडक्या आणि दरवाजे बंद करा. कारण प्रकाशाजवळ जमणारे किडे आणि पतंग संध्याकाळी दिवे लावताच घरात शिरतात. अशा स्थितीत घराचे दिवे लावण्यापूर्वी दारे आणि खिडक्या बंद करून घ्या. त्यामुळे त्यांना घरात प्रवेश करता येणार नाही.

घरभर माश्यांचा हैदोस? ४ भन्नाट उपाय, भिरभिरणाऱ्या माश्या होतील गायब

होममेड मेणबत्ती लावा

सायंकाळी दरवाजे आणि खिडक्या बंद केल्यानंतर, काही वेळ घरात एक मेणबत्ती लावा. ज्यामुळे किडे व पतंग घरात येत नाहीत.

दिवे बंद करा

घरातील दिव्यांच्या आजूबाजूला किडे व पतंग फिरत असतील तर, काही काळासाठी घरातील सर्व दिवे बंद करा. आपण घरात कोपऱ्यात झेंडूच्या फुलांचा किंवा तुळशीच्या पानांचा गुच्छ ठेऊ शकता. यामुळे हे किडे घरात येत नाहीत.

प्लास्टिक डिस्पोजेबल बॉक्स वापरून झाल्यानंतर फेकून देता? ४ भन्नाट वापर, किचन राहील स्वच्छ

घरी एअर फ्रेशनर तयार करा

पतंगांपासून मुक्त होण्यासाठी, आपण घरी एअर फ्रेशनर तयार करू शकता. यासाठी, एका वाटीत बेकिंग सोडा घ्या त्यात नीलगिरीचे काही थेंब, यूकेलिप्टस, सिट्रोनेला, एसेंशिअल ऑइल, व लिंबाचा रस मिसळून मिश्रण तयार करा. हे मिश्रण एका स्प्रे बाटलीत भरा. हा स्प्रे वापरा. ज्यामुळे किडे व प्रकाशाजवळ भिरभिरणार नाही.

या गोष्टी स्वच्छ करा

पावसाळ्यात घराची साफसफाई करण्यासोबतच, खिडकी-दारे, ट्यूबलाइट, बल्ब यांची साफसफाई करत रहा. यासाठी दोन कप पाण्यात एक कप व्हिनेगर आणि लिंबाचा रस मिसळून मिश्रण तयार करा. या मिश्रणात कापड बुडवून - पिळून खिडक्या आणि दारांसह बल्ब आणि ट्यूबलाइट स्वच्छ करा.

टॅग्स :मानसून स्पेशलसोशल मीडियासोशल व्हायरल