बेकिंग सोडा आपल्या प्रत्येकाच्या घरात असतोच. तो असाच स्वयंपाक घरात पडून असतो. कधी काही ठोकळा, वडा तयार करण्याचा बेत असेला तर तो वापरला जातो. नाही तर वापरला जात नाही. (5 uses of baking soda that you should know )कारण बेकिंग सोड्याचे इतर उपयोग आपल्याला माहिती नाहीत. फक्त पदार्थ तयार करण्यासाठी नाही तर, इतरही विविध कारणांसाठी तो वापरता येतो. (5 uses of baking soda that you should know )
बेकिंग सोड्याचे उपयोग(5 uses of baking soda that you should know )
१. किचन मधील बेसीन किंवा सिंक खुप खराब होते. त्यातून वास यायला लागतो. त्यामध्ये अन्न अडकलेलं असतं. मग सफाई कर्मचार्याला बोलवून ते सगळं आपण साफ करून घेतो. खरं तर आधीच वेळोवेळी सिंक साफ केल्याने अशी वेळ येणारच नाही. बेकिंग सोड्याने सिंक घासून साफ करा. तसेच सिंकच्या भोकातून आत सोडा टाका. त्याच्या वरतून थोडं गरम पाणी टाका. वास येणं बंद होईल.
२. दात जर किडायला लागले असतील तर, पेस्टमध्ये थोडाचा बेकिंग सोडा घालून दात घासा. किंवा नुसता सोडा दातांना लावून तो चोळा. नंतर चूळ भरून टाका. असं केल्याने दातांवरील डाग जातात. दातांचा पिवळेपणाही कमी होतो. बेकिंग सोडा हा नैसर्गिक व्हाईटनर मानला जातो.
३. फ्रिज बरेचदा खूपच खराब होतो. मग तो साफ कसा करायचा असा प्रश्न पडतो. फ्रिज साफ असला तरी त्यातून घाण वास येत राहतो. बरेचदा अन्नाचा वास आतल्या आत घुमत राहतो. आतल्या इतरही पदार्थांना तो वास लागतो. अशा वेळी बेकिंग सोड्याने फ्रिज स्वच्छ पुसून घ्या. नंतर एक ओला फडका मारून चिकटलेला सोडा काढून टाका. सोड्याने फ्रिजमधील डागही निघून जातात. वासही जातो.
४. धान्याला किड लागू नये म्हणून, आपण वेगवेगळ्या पावडर वापरतो. धान्याला थोडा बेकिंग सोडा लावून ठेवला तर, त्याला कीड लागत नाही. जर तांदळात वगैरे किडे झाले असतील तर, थोडाचा बेकिंग सोडा घाला. त्यामुळे कीड निघून जाईल.
५. तुमच्या घरात मांजर आहे का? घरात जर मांजर असेल तर, हा उपाय खास तुमच्यासाठी आहे. मांजराच्या विष्ठेचा वास खुपच जास्त घाण येतो. पण कुत्र्याप्रमाणे ते बाहेर जात नाही. घरातील ठराविकच जाग वापरते. घरात एका कोपर्यात मांजरासाठी डबा आपण ठेवलेला असतो. त्याला खुपच जास्त घाण वास येतो. त्या डब्यातही थोडा बेकिंग सोडा घातल्याने वास सुटत नाही. माती किंवा वाळू बरोबर थोडा बेकिंग सोडाही त्या डब्यात घाला.