Lokmat Sakhi >Social Viral > ऊन वाढल्याने घरातही खूप गरम वाटतं? ५ गोष्टी करा, घरात वाटेल थंडगार- शांत...

ऊन वाढल्याने घरातही खूप गरम वाटतं? ५ गोष्टी करा, घरात वाटेल थंडगार- शांत...

5 Tips To Keep Your House Cool In Hot Summer: भर उन्हात घरात तुम्हाला शांत, थंड वाटण्यासाठी काय उपाय करता येतील ते पाहूया...(how to keep house cool in summer?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2025 17:53 IST2025-04-25T16:54:59+5:302025-04-25T17:53:07+5:30

5 Tips To Keep Your House Cool In Hot Summer: भर उन्हात घरात तुम्हाला शांत, थंड वाटण्यासाठी काय उपाय करता येतील ते पाहूया...(how to keep house cool in summer?)

5 tips to keep your house cool in hot summer, how to keep house cool in summer, summer decoration tips for house, how to decorate house for summer | ऊन वाढल्याने घरातही खूप गरम वाटतं? ५ गोष्टी करा, घरात वाटेल थंडगार- शांत...

ऊन वाढल्याने घरातही खूप गरम वाटतं? ५ गोष्टी करा, घरात वाटेल थंडगार- शांत...

Highlightsकाही बदल करून पाहा. यामुळे घरात थोडं का होईना पण नक्कीच गार आणि शांत वाटेल.

सध्या सगळीकडेच उन्हाचा कडाका खूप जास्त वाढला आहे. दुपारच्यावेळी तर घराबाहेर पडण्याची सोयच नाही. अगदी सकाळी १०- ११ वाजेपासूनच घामाच्या धारा सुरू होतात. जसा जसा दिवस वर चढत जातो, तशी तशी अंगाची काहिली होत जाते. घरात पंख्याखाली बसूनही खूप उष्ण वाटते कारण पंख्याचं वारंही गरम येत असतं. त्यामुळेच तर दुपारी १ ते ५ हा वेळ घरात काढणं अनेकांना कठीण होऊन जातं. तुमचा हा त्रास कमी करण्यासाठी घरामध्ये काही बदल करून पाहा. यामुळे घरात थोडं का होईना पण नक्कीच गार आणि शांत वाटेल (5 Tips To Keep Your House Cool In Hot Summer). उष्णतेच्या झळा जरा कमी होतील..(how to keep house cool in summer?)

 

दुपारच्यावेळी घरात उष्ण वाटून गरमी होऊ नये म्हणून काय करावं?

१. दुपारी गरमागरम स्वयंपाक करून जेवण करण्याची सवय असेल तर उन्हाळ्यापुरती ही सवय थोडी बाजुला ठेवा. कारण या दिवसांत जर तुम्ही गॅसजवळ जाऊन स्वयंपाक केला तर उष्णता खूप जास्त जाणवते. त्यामुळे शक्यतो सगळा स्वयंपाक सकाळी १०- ११ वाजेपर्यंतच करून ठेवा. तसेच दुपारची जेवणंही थोडी लवकर करा.

उन्हामुळे खूप टॅनिंग झालं? किचनमधले 'हे' पदार्थ एकत्र करून चेहऱ्यावर चोळा- त्वचा उजळून चमकेल

२. घरात गडद, काळपट रंगाचे पडदे, सोफा कव्हर, बेडशीट असतील तर ती सध्यापुरती ठेवून द्या. या दिवसांत पिवळा, हिरवा, मस्टर्ड यलो, आकाशी अशा रंगाचे पडदे, सोफा कव्हर, बेडशीट वापरा. डोळ्यांना ते सुखद, गार वाटतात.

 

३. या दिवसांत तुमच्या घरात ठिकठिकाणी जिथे शोभेच्या वस्तू ठेवलेल्या असतील तिथे इनडोअर प्लांट्स आणून ठेवा. कारण हिरव्यागार रोपांना पाहून थंड, शांत वाटतं.

कितीही पौष्टिक असले तरी 'हा' त्रास असणाऱ्यांनी मखाना खाऊ नये, आहारतज्ज्ञ सांगतात मखाना खाण्यासाठी...

४. दुपारी साधारण १२ वाजल्यानंतर घराचे पडदे, दरवाजे लावून घ्या. कारण यामुळे बाहेरची उष्णता घरात जाणवणार नाही. घर थोडं थंड राहील. आणि घर तापले नाही तर पंख्यातूनही जरा थंड वारे येईल.

५. कुलरसमोर, टेबल फॅनसमोर किंवा मग सिलिंग फॅन असेल तर त्याच्या अगदी खाली बर्फाने भरलेलं एखादं पातेलं ठेवा. यामुळे पंख्यातून, कुलरमधून निघणारी हवा जास्त थंड होऊन खोली गार होण्यास मदत होते, असं म्हणतात. 


 

Web Title: 5 tips to keep your house cool in hot summer, how to keep house cool in summer, summer decoration tips for house, how to decorate house for summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.