घरात उंदीर झाले की अख्खं घर परेशान होऊन जातं. कारण स्वयंपाक घरापासून ते कपाटापर्यंत सर्वत्र त्याचा वावर असताे. एकदा घरात उंदीर शिरला की तो घरात कुठून कसा फिरेल काही सांगताच येत नाही. घरात उंदीर असले की खूप अस्वच्छ आणि घाण वाटतं. त्यामुळे त्यांना घराबाहेर काढण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो. पण हल्ली माऊस पॅड किंवा उंदीर मारण्याचे औषध फवारूनही उंदीर मरत नाहीत. त्यामुळे मग त्यांना घराबाहेर काढण्यासाठी काय करावं हा प्रश्न पडतो. म्हणूनच आता हे काही सोपे घरगुती उपाय पाहा (5 tips to get rid of rats). यामुळे उंदीर तुमच्या घरातून कायमचे निघून जातील..(how to remove rats from house?)
उंदरांना घराबाहेर काढण्यासाठी उपाय
१.पुदिन्याचा वास उंदरांना अजिबात आवडत नाही. त्यामुळे जर घराच्या कोणत्या दरवाज्यातून किंवा खिडकीमधून तुमच्या घरात उंदीर येतात, असा अंदाज तुम्हाला आला असेल तर त्याठिकाणी पुदिन्याचं रोप लावून ठेवा. घरात जिथे कुठे उंदीर जास्त प्रमाणात फिरत असतील तिथे पुदिन्याचं तेल रोज शिंपडा. त्याच्या तिव्र वासाने उंदीर त्या भागात फिरकणार नाहीत.
हलवा आवडतो, पण गाजर किसत बसण्याचा कंटाळा येतो? घ्या ट्रिक- गाजर न किसता हलवा तयार...
२. उंदीर ज्या भागात जास्त फिरताना दिसतात तिथे थोडं लाल तिखट टाकून ठेवा. उंदरांना तिखटाचा झणका सहन होणार नाही आणि त्यांचं फिरणं बंद होईल.
३. तुरटीच्या वासानेही उंदीर दूर पळतात. त्यामुळे घरात जिथून उंदीर येतात तिथे दारं, खिडक्यांच्या चौकटीवर तुरटीचं पाणी रोज शिंपडा. तसेच घरातही ठिकठिकाणी तुरटी टाकून ठेवा.
केस गळून टक्कल पडण्याची वेळ आली? रात्री केसांना लावा 'हे' पाणी, महिनाभरात नव्याने केस उगवतील
४. लसूणाचा उपयोगही उंदरांना पळवून लावण्यासाठी केला जातो. यासाठी लसूण कुटून तो घरात ठिकठिकाणी ठेवून द्या. लसूणाच्या उग्र वासाने उंदीर कायमचे निघून जातील.
५. कापूर आणि बेकिंग सोडा यांचं पाणी घरात नियमितपणे फवारल्यास उंदीर तुमच्या घरापासून नेहमीच दूर राहतील.
