पाऊस सुरु झाला की पावसात भिजायला जावं असं वाटण्यात काही चूक नाही. पण आपला जीव महत्वाचा आहे आणि अतिरेक करुन आपण पावसाळी हवेत स्वत:सह इतरांनाही वेठीस धरतो का हे पहायला हवे. हिरवेगार डोंगरदऱ्या, टेकड्या अन् त्यावरून फेसाळणारे पांढरे शुभ्र धबधबे. थंड वारा अन् त्यात ओलेचिंब होण्याची मजा प्रत्येकालाच करावीशी वाटते. नयनरम्य निसर्गसौंदर्य अन् ताणतणावापासून दूर जाण्यासाठी सगळेच आसूसलेले असतात. पाऊस पडला की सगळ्यांनाच पावसाळी सहलीला जायचं असतं, काहीजण तर लगेच पावसाळी ट्रेकची तयारी करतात. आणि मग त्यानंतर लगेच पाण्यात बुडून बुडाल्याच्या, डोंगरावरुन पडल्याच्या किंवा डोंगरावरच अडकल्याच्या बातम्या सुरु होतात (Safe Monsoon Picnic). तुम्हीही यंदा पावसाळी सहलीला जाणार असाल तर सावध व्हा..चांगल्या पालकत्वाचे उदाहरण आपल्या मुलांसमोर ठेवा.(how to prepare for monsoon trip)
पावसाळी सहलीला जाताना काय काळजी घ्याल?
१. पावसाळी वातावरण कधी-कधी धोक्याचेही ठरते. अचानक वाढलेला पाऊस, घाटमार्गात कोसळणाऱ्या दरडी, धबधब्यांसह नदी, ओहोळांचा वाढता प्रवाह, दाट धुके, ढगाळ हवामान अन् कमी झालेले व्हिजिबिलीटी. निसरड्या वाटा अशा एक ना अनेक आव्हाने पावसाळी पर्यटनापुढे असतात. पण अनेकांना वाटतं आपल्याला काही गरज नाही सावध राहण्याची, आपल्याला सगळं माहिती आहे.
कोरोना वाढतोय! संसर्ग टाळण्यासाठी स्वयंपाक घरातल्या स्वच्छतेविषयी FSSAI ने सांगितले ३ नियम२. पर्यटक स्थानिक लोक, वनविभागाचे कर्मचारी, पोलिस यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करतात तेव्हा, तीच मोठी चूक. पावसाळी पर्यटन करताना आपण शहरापासून दूर आलो आहाेत, अनोळखी ठिकाणी आपल्याला पुरेसी माहिती नसते अन् त्यामुळेच मोठा ‘धोका’ असतोच. एखादा धबधबा, आहोळ, गडाजवळ जाताना स्थानिक लोकांच्या सूचना फार महत्वाच्या असतात, हे लक्षात घ्यावे. ते लोक तेथे वास्तव्यास असतात, त्यामुळे त्यांना पावसाची स्थिती आणि तेथील ठिकाणांची स्थितीबद्दल चांगली जाण असते, याचा विसर पडू देता कामा नये.
३. आपण जेव्हा कुटुंबासोबत पावसाळी पर्यटनासाठी बाहेर पडतो, तेव्हा आपली जबाबदारी जास्त वाढलेली असते. अशावेळी नको ते धाडस करणे धोक्याचे ठरते. लहान मुलांना होणारा फोटोसेशनचा मोह कुटुंबातील ‘शहाणे’ व्यक्ती म्हणून आपण त्यांची समजूत काढून आवरायला हवा. चिखलामुळे नदी-नाले, ओहोळ व धबधब्याच्या परिसरात वाटा निसरड्या झालेल्या असतात, यामुळे लहान मुलांचा हात सोडता कामा नये. त्यांना पाण्याच्या प्रवाहपासून लांब अंतरावर थांबून आनंद घेण्यासाठी प्रवृत्त करावे.
फ्रिजमधल्या काचा, दरवाज्याचं रबर खूप कळकट झालं? १ सोपा उपाय- १० मिनिटांत फ्रिज चकाचक४. नदीनाले, ओहोळ, धबधब्याच्या प्रवाहाच्याजवळ जाऊ नये. सुरक्षित अंतरावर राहूनसुद्धा निसर्गाचा आनंद लुटता येऊ शकतो. सोबत रेनकोट, छत्री, शॉल, स्वेटर असू द्यावे. पुरेसे खाद्यपदार्थसुद्धा स्नॅक्स, पिण्याचे शुद्ध पाणी सोबत असू द्यावे. चांगल्याप्रकारचे शूज पायात असू द्यावे. वेळमर्यादेचे भान ठेवावे. वातावरणामुळे वेळ लक्षात येत नाही. दुपार अन् संध्याकाळ समजून येत नाही, अशावेळी अधुनमधून घड्याळ बघत रहावे.
५. सोशलमिडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ अन् एखाद्या पर्यटनस्थळाचे ‘रील्स’ बघून पावसाळी पर्यटनासाठी त्याठिकाणी जाण्याचा मोह आवरलेला नेहमीच चांगला.
बनारसी साडी, सिंदूर अन गळ्यात माणिक मोत्यांचा हार! कान्सच्या रेड कार्पेटवर ऐश्वर्या राय आली अन्.....
कारण रील बघून एखादा गड, गिल्ला भ्रमंतीचा ‘प्लॅन’ जीवावर बेतणाराही ठरू शकतो. रील्समध्ये पुरेशी माहिती आजिबात नसते, त्यामुळे पर्यटकांचा घातसुद्धा झालेला आहे. लाइव्ह रिलमध्ये लोकांनी जीव गमावल्याच्या घटना नेहमीच कानावर येतात ते दुर्देवी आहे.