सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत. लवकरच दिवाळी येणार आहे. आता दिवाळसण म्हणजे वर्षातला सगळ्यात मोठा सण. यानिमित्ताने आपण स्वत:साठी, घरासाठी अनेक गोष्टी खरेदी करतो. घरात छोटं- मोठं सामान घेतो. घर सजवतो. अशावेळी आपल्याला असं वाटतं की आपलं घर थोडं मोठं असतं तर किती बरं झालं असतं.. आता घर बदलणं तर शक्य नसतं, पण आहे त्या घरात आपण थोडा बदल केला तर मात्र घराचं रूप नक्कीच बदलू शकतं आणि आपलं घर आहे त्यापेक्षा जास्त मोठं आणि प्रशस्त दिसू शकतं (5 tips for festive season to change look of your house). त्यासाठी नेमकं काय करायचं ते पाहा.. सणासुदीला या काही गोष्टी नक्कीच खूप उपयोगी येणाऱ्या आहेत.(5 Home Decoration Ideas for Festive Season)
लहानसं घर मोठं आणि प्रशस्त दिसण्यासाठी काय करावं?
१. घरातलं सामान हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. घर मोकळं व्हावं असं वाटत असेल तर सगळ्यात आधी घरातल्या अनावश्यक गोष्टी बाहेर काढा. कधीतरी लागतील म्हणून घरात खूप गोष्टी साठवून ठेवलेल्या असतात. पण त्या कधीच लागत नाहीत. त्यामुळे मात्र घरातली खूप जागा अनावश्यक अडली जाते. म्हणून पसारा मोकळा करा.
शंकराला आवडणारी गोकर्णाची फुलं तुमच्या घरातल्या बागेतही फुलतील रोज, ‘हे’ घरगुती खत घाला-पाहा बहर
२. घरात भरपूर उजेड येईल अशा पद्धतीने घरातल्या सामानाची रचना करा. दारं- खिडक्या नेहमी उघड्या ठेवा. यामुळे घरात स्वच्छ सुर्यप्रकाश आणि मोकळी हवा येते. घर प्रसन्न वाटते.
३. भिंतींचा रंग हा देखील खूप महत्त्वाचा भाग आहे. ज्या घरातल्या भिंतींना गडद रंग दिलेला असतो, ते घर मोठं असूनही लहान आणि गजबज दिसतं. त्यामुळे भिंतींना नेहमी फिके आणि फ्रेश रंग द्या. फिके रंग दिल्यामुळे घरात प्रकाशही भरपूर वाटतो आणि घर आहे त्यापेक्षा मोठं दिसतं.
कोल्ड्रिंक्स, चॉकलेट, चिप्स नेहमीच खावे वाटतात? ३ उपाय- त्या पदार्थांची आठवणही येणार नाही
४. घराच्या भिंतींप्रमाणेच पडदे, उशांचे कव्हर, सोफा कव्हर, बेडशीट या वस्तूंचे रंगही खूप महत्त्वाचे आहेत. ते रंगही नेहमी फ्रेश असावे. काळपट रंग निवडल्याने घर डल वाटते.
५. घरातलं फर्निचर नेहमी असं निवडा जे सहज हलवता येईल, फिक्स नसेल आणि ज्यामध्ये स्टोरेजसाठीही जागा असेल. यामुळे बरंच सामान त्यात मावतं आणि मुव्हेबल असल्याने जागा अडून राहात नाही.