Lokmat Sakhi >Social Viral > Home Decor: छाेटंसं घरही दिसेल प्रशस्त आणि मोठ्ठं! ५ गोष्टी करा, तुमचं घरही दिसेल सुंदर

Home Decor: छाेटंसं घरही दिसेल प्रशस्त आणि मोठ्ठं! ५ गोष्टी करा, तुमचं घरही दिसेल सुंदर

Home Decoration Ideas: तुमचं घर छोटं असलं तरी ते मोठं आणि प्रशस्त दिसण्यासाठी या काही home decor tips नक्कीच उपयोगी ठरू शकतात.(5 home decor tips to make your small house look big, royal and classy)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2025 18:00 IST2025-06-17T16:48:33+5:302025-06-17T18:00:02+5:30

Home Decoration Ideas: तुमचं घर छोटं असलं तरी ते मोठं आणि प्रशस्त दिसण्यासाठी या काही home decor tips नक्कीच उपयोगी ठरू शकतात.(5 home decor tips to make your small house look big, royal and classy)

5 home decor tips to make your small house look big, royal and classy, how to give royal, classy look to your middle class small house? home decoration ideas | Home Decor: छाेटंसं घरही दिसेल प्रशस्त आणि मोठ्ठं! ५ गोष्टी करा, तुमचं घरही दिसेल सुंदर

Home Decor: छाेटंसं घरही दिसेल प्रशस्त आणि मोठ्ठं! ५ गोष्टी करा, तुमचं घरही दिसेल सुंदर

Highlights घरातल्या खोल्यांना तुम्ही कुठला रंग दिला आहे हे खूप महत्त्वाचं आहे. घरातले उशांचे कव्हर, बेडशीट, सोफर कव्हर, पडदे कुठल्या रंगाचे आहेत हे सुद्धा एकदा तपासा.

तुमचं घर मोठं असो अथवा छोटं असो... तिथल्या काही वस्तू जर चुकीच्या निवडल्या गेल्या तर मोठं घरही अगदी गजबजलेलं, अडचणीचं आणि छोटं दिसू लागतं. म्हणूनच घर सजवण्यासाठी आपण ज्या वस्तूंची निवड करतो ती अगदी अचूक होणं गरजेचं आहे. वस्तूंची निवडी बरोबर जमून आली तर छोट्याशा घरालाही अगदी प्रशस्त, रॉयल आणि रीच लूक येऊ शकतो (how to give royal, classy look to your small middle class house?). त्यासाठी घर सजवताना नेमक्या कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या टाळाव्या हे एकदा बघा (home decoration ideas) आणि हे काही साधे सोपे बदल तुमच्या घरात करून स्वतःच त्याचा अनुभव घ्या.(5 home decor tips to make your small house look big, royal and classy)

 

घर मोठं आणि प्रशस्त दिसण्यासाठी काय उपाय करावे?

१. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या घरातल्या खोल्यांना तुम्ही कुठला रंग दिला आहे हे खूप महत्त्वाचं आहे. घराला नेहमी पांढरा, मोतिया, हलका पिवळा असे फ्रेश, चमकदार कलर द्यावेत. घराचा रंग जेवढा फिका आणि चमकदार असेल तेवढं तुमचं घर जास्त प्रशस्त वाटू लागेल. गडद रंगांच्या भिंतींमुळे घर छोटं वाटतं. 

वजन कमी करण्याचे सोपे ४ उपाय! झटपट इंचेस लॉस होऊन ८ दिवसांतच दिसेल फरक

२. तुमच्या घरातले उशांचे कव्हर, बेडशीट, सोफर कव्हर, पडदे कुठल्या रंगाचे आहेत हे सुद्धा एकदा तपासा. जर ह्या सगळ्या वस्तूंचे रंग गडद, काळपट शेडचे असतील तर तुमचं घर मोठं असूनही छोटं वाटेल. त्यामुळे बेडशीट, सोफा कव्हर, उशांचे कव्हर आणि पडदे हे सगळे फ्रेश रंगाचे आणि बारीक प्रिंटचे डिझाईन असणारे घ्या. 

 

३. घरातलं सामान व्यवस्थित जागच्याजागी ठेवणं अतिशय गरजेचं आहे. घरात प्रत्येक ठिकाणी सामान पडलेलं असेल, कपडे पडलेले असतील तर ते घर कितीही मोठं असूनही गबाळं, अडचण असलेलंच दिसेल. त्यामुळे वस्तू जागच्या जागी ठेवा. 

बाकी शरीर एकदम प्रमाणात, पण दंडच गोल, गुबगुबीत झाले? ३ व्यायाम करा- हात होतील सुडौल

४. घरातलं फर्निचर करताना ते खूप जड आणि हेवी डिझाईन असणारं घेऊ नका. जेवढं लाईट वेट आणि मुव्हेबल फर्निचर घ्याल तेवढं तुमचं घर अधिक देखणं दिसेल. 

अर्ध्या तासात टोमॅटो केचअप तयार! घ्या कोणतंही प्रिझर्व्हेटीव्ह, केमिकल्स नसणाऱ्या केचअपची सोपी रेसिपी 

५. घरामध्ये प्रकाशयोजना म्हणजेच लाईटची व्यवस्था उत्तम असायला हवी. घरात जेवढा मोकळा उजेड असेल तेवढं घर अधिक प्रशस्त दिसेल. त्यामुळे तुमच्या घरात भरपूर लाईट लावा आणि त्या लाईटचा उजेडही स्वच्छ पांढरा किंवा चमकदार पिवळा अशा पद्धतीचाच ठेवा.

 

Web Title: 5 home decor tips to make your small house look big, royal and classy, how to give royal, classy look to your middle class small house? home decoration ideas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.