सिंगल लाइफ हा शब्द तुम्ही नक्कीच ऐकला असेल. आधी सिंगल लाइफ म्हणजे एकटेपणा तसेच कंटाळवाणा प्रकार वगैरे मानला जायचा. नंतर हळूहळू लोकांना एकटं राहायला आवडायला लागलं.(45 % of girls will remain 'single' by 2030, study claims) आता सिंगल लाइफ म्हणजे स्वातंत्र्य, शांतता असं मानलं जातं. आजकाल महिला अशीच जीवनशैली बरी असं म्हणायला लागल्या आहेत. एकेकाळी महिलांचे आयुष्य घराच्या चार भिंतींपुरतं मर्यादित होतं. पण आता तो काळ भूतकाळात जमा झाला. महिला स्वत:च्या मनानुसार स्वत:चं आयुष्य जगतात.(45 % of girls will remain 'single' by 2030, study claims) अर्थाच बऱ्याच ठिकाणी आजही महिलांना स्वतःचे निर्णय घेण्याची परवानगी नाही. महिलांचे प्राधान्य सिंगल लाईफच्या दिशेने जाताना दिसत आहे. पण असे का होत आहे नक्की काय कारणे आहेत जाणून घ्या.
मॉर्गन स्टॅन्ली यांच्या अभ्यासानुसार, २०३० साला पर्यंत वय वर्ष २५ ते ४४ च्या गटातील ४५ % महिला एकट्या राहतील. ना कोणतं नातं, ना मुल- बाळ. त्यानी स्वत:हून हे आयुष्य निवडलं असेल. पण नक्की कारणं काय असू शकतात असे निर्णय घेण्यामागे?(45 % of girls will remain 'single' by 2030, study claims)
महिला आता करीयरला जास्त महत्त्व देतात. कितीही काही म्हटलं तरी लग्नानंतर घरातील कामं महिलेवरच पडतं. दोघेही वर्किंग असले तर हाल फक्त त्या स्त्रीचे होतात. हे ही एक कारण असू शकतं की मुलींना नात्यांचं बंधन नको वाटतं. पुढे मुलंबाळ झाल्यावर तर नोकरी व्यवसाय बंदच करावा लागेल. या भतीने महिला सिंगल लाईफचा निर्णय घेत असाव्यात.
दुसरं म्हणजे चांगला जोडीदार मिळाला नाही तर काय? या भीती पोटी लग्न नकोच, असं त्यांना वाटतं असावं. आजूबाजूला घडणारे भयानक प्रकार आपण ऐकत असतो. कदाचित या सर्व घटनांचा परिणाम असू शकतो. अशी अनेक कारणे असू शकतात. एकटं राहायचं का दुकटं? बाळ हवं का नको? हा प्रत्येकाचा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण ४५% महिला कोणत्याही नात्यात न आल्यास त्याचे समाजावर काय परिणाम होऊ शकतात? हा विचार करण्याजोगा प्रश्न आहे.