Join us

गहू टिकतील वर्षांनुवर्षे- अळ्या, किडे अजिबात होणार नाहीत! धान्य भरताना लक्षात ठेवा ४ टिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2025 16:43 IST

4 Home Hacks For The Storage Of Wheat For Long: तुम्ही घेतलेले गहू वर्षभर चांगले राहावे, त्यात किडे, अळ्या होऊ नयेत यासाठी या काही खास टिप्स..(best traditional method to store wheat for years)

ठळक मुद्देगहू भरून ठेवण्याच्या या काही पारंपरिक पद्धती पाहा, तुम्ही घेतलेला गहू वर्षभर अगदी चांगला टिकून राहण्यास मदत होईल.

उन्हाळा म्हणजे खारोड्या, कुरडया, चकल्या, चिप्स, पापड्या असे वर्षभराचे वाळवणाचे पदार्थ एकदाच करून ठेवण्याचा काळ. त्याचप्रमाणे या दिवसांतच वर्षभर पुरणारं लाल तिखट, काळा मसाला, गोडा मसाला, कांदा- लसूण मसाला असं सगळं सुद्धा करून ठेवलं जातं. या कामांप्रमाणेच आणखी एक मुख्य उन्हाळी काम म्हणजे वर्षभराचं धान्य भरून ठेवणे. सगळ्या धान्यांपेक्षा गहू जरा जास्तच लागतात. त्यामुळे आपण ते भरपूर प्रमाणात घेतो, शिवाय जास्त पैसे खर्च करून उत्तम दर्जाचा गहू घेतो आणि नेमके तेच गहू किडे, अळ्या लागून खराब होतात. असं होऊन पैशांचं नुकसान होऊ नये म्हणून गहू भरून ठेवताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे (4 Home Hacks For The Storage Of Wheat For Long). गहू भरून ठेवण्याच्या या काही पारंपरिक पद्धती पाहा (how to store wheat for long?).. त्यामुळे तुम्ही घेतलेला गहू वर्षभर अगदी चांगला टिकून राहण्यास मदत होईल.(best traditional method to store wheat for years)

 

गहू वर्षभर चांगला राहण्यासाठी टिप्स

१. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही बाजारातून गहू विकत आणाल तेव्हा तो एकदा व्यवस्थित निवडून घ्या. त्यानंतर निवडून झालेल्या गव्हाला एखादा दिवस अगदी कडक ऊन दाखवा आणि त्यानंतरच तो भरून ठेवा.

'हा' गंभीर आजार झाल्याने समंथा प्रभूनं जंकफूडच्या जाहिरातींना दिला नकार

२. गहू भरून ठेवण्यासाठी तुम्ही जी कोठी किंवा ड्रम वापरणार आहात तो एकदा स्वच्छ धुवून उन्हात चांगला वाळवून घ्या. ड्रम किंवा कोठी जेव्हा पुर्णपणे कोरडी होईल तेव्हाच त्यामध्ये गहू भरावेत.

३. गहू ज्या कोठीमध्ये भरून ठेवणार आहात त्या कोठीच्या तळाशी कडुलिंबाचा पाला घाला. कडुलिंबाचा पाला घालण्यापुर्वी तो कुठेही ओलसर नाही ना, हे एकदा तपासून घ्या. 

 

४. कडुलिंबाचा पाला आणि त्यावर गहू, पुन्हा कडुलिंबाचा पाला आणि पुन्हा गहू असे एकावर एक थर देत कोठीमध्ये गहू भरा. त्याशिवाय एका सुती, स्वच्छ, कोरड्या कपड्यामध्ये लवंग, काडेपेटी, कापूर असं गुंडाळा आणि तो कपडाही गव्हामध्ये ठेवा.

काय सांगता गुलाबाच्या पाकळ्यांमुळे पोट साफ व्हायला मदत होते? रामदेव बाबा सांगतात खास उपाय

सगळ्यात वर पुन्हा कडुलिंबाच्या पाल्याचा थर द्या. अशा पद्धतीने जर तुम्ही गहू भरून ठेवले तर ते वर्षभर अगदी चांगले राहतील. शिवाय कोठीतून गहू काढताना त्याला ओलसर हात लागणार नाहीत याचीही काळजी प्रत्येकवेळी घ्या. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलहोम रेमेडीसमर स्पेशलगहूकिचन टिप्स