पावसाळा आला की आपल्यासोबत अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या देखील घेऊन येतो. पावसाळ्यामध्ये हवेत ओलावा जास्त असल्यामुळे घरातील अनेक वस्तूंमध्ये (Monsoon Fridge Care) कुबटपणा आणि बुरशीची समस्या वाढते. पावसाळ्यात (fridge odor removal during Monsoon Season) ओलाव्याने कपडे व्यवस्थित वाळत नाहीत, भिंती ओलाव्याने खराब होतात, इतकंच नाही तर मसाले,पिठं देखील (4 tips for monsoon fridge hacks) ओलाव्याने खराब होतात. याचबरोबर, अजून एक समस्या त्रास देते ती म्हणजे फ्रिजमधून येणारी कुबट दुर्गंधी. अन्नपदार्थांचा ताजेपणा टिकवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या फ्रिजमधून या दिवसांत कुबट आणि खराब दुर्गंधी येऊ लागते. त्यामुळे फक्त अन्नपदार्थांची चव आणि सुगंधच नाही तर आरोग्यावरही वाईट परिणाम होऊ शकतो(moisture control in fridge).
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते आणि स्वयंपाकघरातील फ्रिजसहित इतर उपकरणांमध्ये ओलसरपणा साचून राहतो. यामुळे, या दिवसांत फ्रिज वारंवार स्वच्छ करावा लागतो इतकंच नाही तर, ओलसरपणा नेहमी पुसून स्वच्छ करावाच लागतो. यासोबतच, फ्रिजमधील अन्नपदार्थ पटकन खराब होणे, बुरशी वाढणे आणि कुबट वास येणे अशा समस्या फारच कॉमन होतात. पावसाळ्यातील ही समस्या त्रासदायकच नाही तर आरोग्यासाठी देखील घातक ठरु शकते. असे होऊ नये यासाठी नेमका काय घरगुती उपाय करायचा ते पाहूयात.
नेमका उपाय काय आहे ?
पावसाळ्यात फ्रिजमधून येणाऱ्या कुबट दुर्गंधीवर उपाय म्हणून एक छोटासा किचन हॅक कमाल करू शकतो – तो म्हणजे फ्रिजमध्ये मिठाने भरलेली छोटी वाटी ठेवणे. होय, हा अगदी सोपा पण परिणामकारक उपाय आपली आई किंवा आजी वर्षानुवर्षे वापरत असतील. जर आपण अजूनही या सोप्या ट्रिककडे दुर्लक्ष करत असाल, तर आता नक्कीच एकदा ही साधीसोपी ट्रिक नक्की वापरून पाहा.
फ्रिजरमध्ये बर्फाचा डोंगर? ६ टिप्स, एका मिनिटात बर्फ वितळून फ्रिज होईल स्वच्छ...
१. फ्रिजमधील ओलावा करते गायब :- मीठ हा नैसर्गिकरित्या ओलावा शोषून घेणारा पदार्थ आहे. पावसाळ्यात हवेत आर्द्रता वाढली की त्याचा परिणाम फ्रिजच्या आतही जाणवतो. फळे-भाज्या पटकन खराब होऊ लागतात, तर फ्रिजच्या आतील भागात चिकटपणा जाणवतो. अशावेळी फ्रिजच्या एका कोपऱ्यात मिठाची वाटी ठेवली, की ते मीठ हळूहळू आसपासचा ओलावा शोषून घेतं आणि आतलं वातावरण कोरडं ठेवण्यास मदत करतं.
२. दुर्गंधी कमी करण्यास मदत होते :- फ्रिज उघडताच वेगवेगळ्या अन्नपदार्थांच्या वासामधून तयार झालेली एक विचित्र दुर्गंधी जाणवते. मीठामध्ये वास शोषून घेण्याची उत्कृष्ट क्षमता असते, त्यामुळे ते नैसर्गिक डिओड्रंटप्रमाणेच काम करते. हा उपाय केल्यावर काहीच दिवसांत तुम्हाला जाणवेल की फ्रिज आधीपेक्षा अधिक फ्रेश आणि स्वच्छ वाटू लागला आहे.
गार झाल्यावरही टम्म फुगलेल्याच राहतील पुऱ्या! पाहा ६ टिप्स- मस्त पुऱ्या डब्यात द्या, सावकाश खा...
३. बुरशी आणि जंतूंपासून संरक्षण :- फ्रिजमधील ओलाव्याचा परिणाम फक्त दुर्गंधीपुरता मर्यादित नसतो, तर त्यामुळे बुरशी (fungus) आणि जंतू वाढण्यासही सुरुवात होते. विशेषतः ट्रेच्या कडा किंवा कोपऱ्यांमध्ये काळे डाग दिसू लागतात. फ्रिजमध्ये मिठाची वाटी ठेवल्याने फ्रिजच्या आतील वातावरण कोरडे राहते, ज्यामुळे अशा हानिकारक घटकांची वाढ होत नाही.
४. फळे-भाज्यांचा ताजेपणा वाढतो :- फ्रिजमधील ओलावा कमी झाला की फळे आणि भाज्या पटकन खराब होत नाहीत. हिरव्या पालेभाज्या, पालक, कोथिंबीर किंवा कोबीसारख्या भाज्या जास्त दिवस ताज्या राहतात. मीठाची ही ट्रिक अन्नपदार्थांची नासाडी कमी करून पैशांचीही बचत करते.
कसा कराल मिठाचा योग्य वापर ?
१. एक छोटी वाटी घ्या आणि त्यात ३ ते ४ टेबलस्पून जाड मीठ भरुन घ्या.
२. ती मिठाने भरलेली वाटी फ्रिजच्या एका कोपऱ्यात ठेवा.
३. दर ८ ते १० दिवसांनी या वाटीतील मीठ बदला, कारण हळूहळू ओलावा शोषून त्याचा परिणाम कमी होतो.
काले घने रेशमी बालों का राज, एक लोखंडी तवा! तव्यावरच्या तेलाची जादू, केसगळती कायमची गायब...
अजूनही काही सोप्या ट्रिक्स लक्षात ठेवा...
१. मिठात थोडा बेकिंग सोडा मिसळा यामुळे दुर्गंधी आणखी लवकर नाहीशी होईल.
२. वाटीत सुक्या लिंबाच्या साली ठेवा हे नैसर्गिक फ्रेशनरचे काम करतील.
३. आपण फ्रिजमध्ये कॉफीच्या बिया किंवा जुने सुकलेले टी-बॅग्स देखील ठेवू शकतो यामुळे फ्रिजमध्ये ताजेपणा राहतो.
४. जर पृष्ठभाग स्वच्छ ठेवायचा असेल, तर वाटीखाली अॅल्युमिनियम फॉईल पसरवा, त्यामुळे ओले झालेले मीठ फ्रिजमध्ये पडून घाण होणार नाही.