lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > ४ लक्षणं सांगतात तुमचा फ्रिज जुना झाला, आता बदला! बघा, बिघडण्यापूर्वी घ्या नवा फ्रीज 

४ लक्षणं सांगतात तुमचा फ्रिज जुना झाला, आता बदला! बघा, बिघडण्यापूर्वी घ्या नवा फ्रीज 

4 Changes in your fridge that can cause health issue: आरोग्याची चावी आता फ्रिजच्या हातात आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, एवढे वेगवेगळे खाद्यपदार्थ आपण त्यात काेंबत असतो. तो फ्रिज फिट आहे की त्याचीच तब्येत बिघडली आहे, हे सांगणारी ही ४ लक्षणं माहिती असायलाच पाहिजेत. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2022 02:40 PM2022-08-10T14:40:29+5:302022-08-10T14:54:26+5:30

4 Changes in your fridge that can cause health issue: आरोग्याची चावी आता फ्रिजच्या हातात आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, एवढे वेगवेगळे खाद्यपदार्थ आपण त्यात काेंबत असतो. तो फ्रिज फिट आहे की त्याचीच तब्येत बिघडली आहे, हे सांगणारी ही ४ लक्षणं माहिती असायलाच पाहिजेत. 

4 Signs that says your refrigerator is not in a good condition, need to repair it or change it urgently | ४ लक्षणं सांगतात तुमचा फ्रिज जुना झाला, आता बदला! बघा, बिघडण्यापूर्वी घ्या नवा फ्रीज 

४ लक्षणं सांगतात तुमचा फ्रिज जुना झाला, आता बदला! बघा, बिघडण्यापूर्वी घ्या नवा फ्रीज 

Highlightsएवढं सगळं अन्न आपण ज्या फ्रिजमध्ये कोंबतोय, तो आता जुना झाला आहे, बदलण्याची गरज आहे, हे कसं ओळखायचं, हे सांगणारी ही काही लक्षणं प्रत्येक घरातल्या व्यक्तीला माहिती असायलाच हवीत.

फ्रिज हा आता प्रत्येक घरातला एक अविभाज्य घटक.. फ्रिज खराब (how to identify that the refrigerator is not in a good condition?) झाल्यानंतर एक दिवसही काढणं अवघड होऊन जातं, एवढी आपल्याला त्याची सवय झालेली असते. अगदी दूध- पाण्यापासून ते फळं, भाज्या, उरलेले पदार्थ, ब्रेड, बटर, चीज, सुकामेवा असं काय काय आपण त्या फ्रिजमध्ये कोंबून ठेवत असतो. आजकाल तर डायनिंग टेबलवर कमी आणि फ्रिजमध्येच जास्त खाद्यपदार्थ दिसून येतात. पण एवढं सगळं अन्न आपण ज्या फ्रिजमध्ये कोंबतोय, तो आता जुना झाला आहे, बदलण्याची गरज आहे, हे कसं ओळखायचं, हे सांगणारी ही काही लक्षणं प्रत्येक घरातल्या व्यक्तीला माहिती असायलाच हवीत. कारण आता आपलं आरोग्य बऱ्याच प्रमाणात आपण फ्रिजच्या हातात दिलंय, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. (these changes in your fridge are not good for your health)

 

फ्रिज खराब होत आहे हे सांगणारी काही लक्षणं
१. आवाज येणे

फ्रिजमध्ये मोटार फिट केलेली असते. तुम्ही जर थाेडं लक्ष देऊन ऐकलं तर ठराविक वेळाने फ्रिजमधली ही मोटार ॲक्टीव्हेट होत असते. त्यावेळी फ्रिजचा आवाज नेहमीपेक्षा थोडा मोठा ऐकू येतो. काही वेळाने हा आवाज आपोआप थांबून जातो. पण हा आवाज जर वारंवार होऊ लागला किंवा एकदा सुरू झाल्यावर खूपच जास्त वेळ राहू लागला तर फ्रिजमध्ये काही तरी बिघाड होतो आहे हे लक्षात घ्या.

 

२. बर्फाचं प्रमाण जास्त होणं

सालकाढे किंवा सोलाणे बोथट झाले, घरच्याघरी धार लावण्यासाठी ३ टिप्स, साले निघतील सरसर
हिवाळ्यात, पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात कितीवर फ्रिज सेट करायचं हे ठरलेलं असतं. त्यानुसार फ्रिज सेट करूनही जर फ्रिजमध्ये खूपच बर्फ जमत असेल, संपूर्ण फ्रिजर बर्फाने भरून जात असेल, तर ते काही चांगलं लक्षण नाही. नंतर तर हा त्रास एवढा वाढतो की फ्रिजमध्ये ठेवलेल्या दुधावरही बर्फाचा थर जमतो, भाज्यांवरही बर्फ जमू लागतो. अशा फ्रिजमधलं अन्न खाणं आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे. 

 

३. पाणी गळणं
फ्रिजमधून पाणी गळणंदेखील चांगलं नाही. या अवस्थेत एकतर फ्रिजखालून पाणी येतं.

नारळी भात कधी गचका होतो, कधी खूपच गोड? घ्या अचूक प्रमाण, करा परफेक्ट नारळीभात

किंवा अनेक फ्रिजच्या खालच्या भागात ड्राय स्टाेरेजसाठी जो ट्रे असतो, त्यात पाणी जमायला लागतं किंवा मग फ्रिजच्या दरवाज्याला जे रबर असतं, त्यावर पाणी दिसू लागतं. अशा कोणत्याही प्रकारे पाणी गळत असेल, फ्रिज तात्काळ दुरुस्त करून घ्यावं.

 

४. फ्रिज खूप जास्त गरम होणं
इलेक्ट्रिक वस्तू असल्याने ती दिवसांतला काही काळ हाताला कोमट लागणारचं. पण फ्रिज जर खूप जास्त गरम व्हायला लागलं, आणि दिवसभर तसंच गरम राहू लागलं, तर मात्र ते लवकर दुरुस्त करून घेण्याची गरज आहे. या प्रकारात फ्रिजचा दरवाजा, वरचा भाग, बाजूचा भाग असे सगळेच पार्ट गरम होऊ लागतात. 
 

Web Title: 4 Signs that says your refrigerator is not in a good condition, need to repair it or change it urgently

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.