पाली असो किंवा झुरळं दोन्ही कीटक घरात घाण पसरवतात. घराच्या कानाकोपऱ्यांमध्ये शिरतात. एकदा घरात झुरळं झाले तर त्यांची बारीक पिल्लं घरभर फिरत असतात. महागडं पेस्ट कंट्रोल आणि केमिकलयुक्त स्प्रे वापरूनही अनेकदा पाली कमी होत नाहीत. पेस्ट कंट्रोलसारख्या केमिकल्स ट्रिटमेंट करण्यातही बरेच पैसे वाया जातात. (How To Get Rid Of Lizards And Cockroaches)
हे त्रास टाळण्यासाठी तुम्ही काही सोपे घरगुती उपाय करू शकता. आपण रोज फरशी पुसतो तेव्हाच काही उपाय केले तर झुरळं, पालींना दूर पळवणं एकदम सोपं होईल. रोजची कामं करताना घर स्वच्छ ठेवली तर कीटक की होण्यासही मदत होईल. (3 Things To Add Mop Water To Get Rid Of Lizards And Cockroaches)
पाली, झुरळांना दूर पळवण्यासाठी सोपा उपाय कोणता?
1) सैंधव मीठ- सैंधव मिठाचा वास तीव्र असतो जो पाली आणि झुरळांना जराही आवडत नाही. सैंधव मीठाच्या वासानं झुरळं दूर पळतात आणि त्यांचा घरातील वावरही कमी होतो.
2) व्हिनेगर- व्हिनेगर एक पावरफुल क्लिनिंग एजंट आहे. व्हिनेगरचा आंबट वास, किटकांना दूर ठेवतो. ज्याठिकाणी झुरळं जास्त दिसतात अशा घराच्या कोपऱ्यांवर व्हिनेगरनं स्प्रे करा. व्हिनेगरच्या द्रावणाचा वास झुरळं, पालींना सहन होणार नाही आणि ते दूर पळतील.
3) कडुलिंबाचे तेल- कडुलिंब एक नैसर्गिक किटकनाशकाच्या स्वरूपात ओळखले जाते. याचा कडवट वास झुरळांना जराही आवडत नाही, हा एक सुरक्षित उपाय आहे. कडुलिंबाच्या रसाचा किंवा कडुलिंबाच्या तेलाचा स्प्रे मारला तर पाली कमी होण्यास मदत होईल.
हा उपाय कसा करावा?
एक बादली पाणी घ्या. त्यात २ चमचे सैंधव मीठ, अर्धा कप व्हिनेगर, १५ ते २० मिनिटं कडुलिंबाचं तेल घाला. हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करा. रोज या पाण्यानं घराची फरशी पुसा. खासकरून अशा ठिकाणी व्यवस्थित पुसा जिथे पाली आणि झुरळं जास्त येतात. किचनचे कोपरे, भिंती, बाथरूमजवळ व्यवस्थित पुसा.
हा उपाय काही दिवस केल्यानंतर तुम्हाला फरक दिसून येईल. तुमच्या घरातील पाली, झुरळं आपोआप गायब होतील. केमिकल्सयुक्त उपाय करण्यापेक्षा हे घरगुती, सुरक्षित उपाय करा ज्यामुळे घर स्वच्छ आणि इंसेक्ट्स-फ्री दिसेल.