Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिवसभर ए.सी-पंखा सुरू असूनही खोली 'भट्टी'सारखी तापतेय? उन्हाळ्यात घर गार ठेवण्यासाठी करा 'हे' ३ स्मार्ट बदल....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2026 15:54 IST

3 simple tips to keep your room cool in summer : common mistakes that make your room hotter : how to maintain AC for better cooling performance : दिवसभर ए.सी आणि पंखा सुरू असूनही खोलीत थंडावा वाटत नाही कारणं...

उन्हाळ्याचे दिवस सुरु होताच घराघरांत ए.सी - फॅनचा फार मोठ्या प्रमाणावर वापर सुरु होतो. रणरणतं ऊन इतकं वाढलय की ए.सी - फॅनशिवाय आता घरात राहणंही कठीण झालं आहे. अनेक घरांमध्ये दिवसभर पंखा आणि एअर कंडिशनर (AC) सुरू असतो, तरीही गरम होण्याचं प्रमाण कमी होत नाही. कित्येकदा अनेकांची अशी तक्रार असते की, खोलीमध्ये दिवसभर पंखा आणि एअर कंडिशनर सुरू असूनही, गरम होण्याचं प्रमाण कमी होत नाही. इतकंच नाही तर खूप घाम येतो किंवा खोली हवी तशी थंड होत नाही(3 simple tips to keep your room cool in summer).

उन्हाचा तडाखा सुरू झाला की, आपल्या सर्वांच्या घरांमध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत पंखा सुरू असतो, कुलर देखील थंडगार हवेसाठी लावला जातो आणि खिडक्या-दरवाजे बंद करून तासंतास AC लावला जातो. पण तुमच्यासोबतही असं घडतंय का की, इतकी वीज खर्च करूनही खोलीत हवा तसा थंडावा जाणवत नाहीये? जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा AC खराब झालाय किंवा पंखा हळू चालतोय, तर जरा थांबा! अडचण या (common mistakes that make your room hotter) उपकरणांमध्ये नाही, तर तुमच्या खोलीतील 'एअर सर्क्युलेशन' आणि 'व्हेंटिलेशन' मध्ये असू शकते. सर्व प्रयत्न करूनही खोलीत हवा तसा थंडावा न येण्याची मुख्य कारणं नेमकी कोणती ते पाहूयात. 

कुलर-पंखा-ए. सी सुरू असूनही खोली 'भट्टी'सारखी का तापते?

जेव्हा आपण कुलर किंवा पंखा सुरू करतो, तेव्हा आपल्याला वाटतं की खोली लगेच गार होईल. पण अनेकदा उलटंच घडतं - खोलीतली गरम हवा बाहेर जाण्याऐवजी तिथेच फिरत राहते. याची काही प्रमुख कारणं खालीलप्रमाणे आहेत. 

१. खोलीतील हवा (Air Quality) :- बहुतेक लोक ए. सी चालू असताना खोली चहूबाजूंनी पूर्णपणे बंद करून टाकतात. त्यांना वाटते की बाहेरची हवा आत आली नाही, तर खोली लवकर थंड होईल. हे काही अंशी बरोबर असले तरी, जेव्हा खोलीतील हवा बाहेर पडू शकत नाही, तेव्हा ती आधीची हवा थोडी कोमट गरम उष्ण असते. ही हवा जड आणि दमट असते. आपण श्वास सोडतो तेव्हा कार्बन डायऑक्साइड आणि आर्द्रता खोलीतच राहते. याच कारणामुळे तासंतास ए. सी सुरू असूनही तुम्हाला कधीकधी अस्वस्थता, घाम किंवा शरीराला जडपणा जाणवतो.

माठातलं पाणी प्रत्येकवेळी आरोग्यासाठी अमृत नसतं! 'या' ८ लोकांनी चुकूनही पिऊ नये - मिळेल आजारांना निमंत्रण... 

२. क्रॉस व्हेंटिलेशन (Cross Ventilation) :- गावाकडच्या जुन्या घरांमध्ये तुम्ही पाहिले असेल की खिडक्या नेहमी समोरासमोर असायच्या. यालाच 'क्रॉस व्हेंटिलेशन' म्हणतात. आजच्या फ्लॅट्स आणि छोट्या खोल्यांमध्ये फक्त एक खिडकी किंवा दरवाजा असतो. जोपर्यंत हवेला बाहेर पडायला जागा मिळत नाही, तोपर्यंत थंड हवा लागू शकत नाही. जर गरम हवा खोलीच्या वरच्या भागात साचलेली असेल, तर पंखा फक्त तीच गरम हवा पुन्हा खाली ढकलत राहतो.

३. हीट रिटेंशन (Heat Retention) :- जर तुमच्या खोलीच्या भिंतीवर थेट सूर्यप्रकाश पडत असेल, तर ती भिंत संध्याकाळपर्यंत पूर्णपणे तापून गरम होते. रात्री जेव्हा तुम्ही AC लावता, तेव्हा AC ला हवा थंड करण्यापेक्षा त्या भिंतीतील उष्णता शोषून घेण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते. जोपर्यंत भिंत पूर्णपणे थंड होत नाही, तोपर्यंत तुमची खोली तुम्हाला हवी तशी थंड जाणवणार नाही.

ब्रेसियरमध्ये एकापुढे एक तीनच हुक का असतात? महिलांना माहीतच नसते खरे कारण... 

उन्हाळ्यातही खोली थंड ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या टिप्स... 

१. सकाळ-संध्याकाळ खिडक्या उघड्या ठेवा :- सूर्य उगवण्यापूर्वी आणि सूर्य मावळल्यानंतर किमान २० मिनिटांसाठी खोलीच्या खिडक्या आणि दरवाजे पूर्णपणे उघडून द्या. यामुळे रात्रीची थंड हवा आत येईल आणि खोलीतील कोंदटपणा दूर होईल.

२. एक्झॉस्ट फॅनचा वापर :- एक्झॉस्ट फॅन फक्त किचनमध्येच नाही, तर बेडरूममध्येही असणे फायद्याचे ठरते. रात्री AC सुरू करण्यापूर्वी १० मिनिटे एक्झॉस्ट फॅन चालवा, जेणेकरून खोलीच्या वरच्या भागात साचलेली गरम हवा बाहेर निघून जाईल.

मेहेंदी फक्त पाण्यांत कालवून केसांना लावताय? मेहेंदी पावडर सोबतच घाला ५ पदार्थ - पांढरे केस होतील काळेभोर... 

३. क्रॉस व्हेंटिलेशनची काळजी घ्या :- जर तुमच्या खोलीत एकच खिडकी असेल, तर दरवाजा थोडा उघडा ठेवा किंवा समोरील खोलीची खिडकी उघडा. यामुळे हवेला जाण्या-येण्यासाठी मार्ग मिळेल आणि खोली लवकर थंड होईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Room still hot despite AC? Try these 3 smart changes.

Web Summary : AC running but room hot? Poor air circulation, lack of cross-ventilation, and heat retention are culprits. Open windows, use exhaust fans, ensure ventilation for cooling.
टॅग्स :सोशल व्हायरलसमर स्पेशलहोम अप्लायंससुंदर गृहनियोजन