किचन सिंक हा आपल्या स्वयंपाक घरातला असा एक भाग असतो जो दिवसातला जास्तीतजास्त वेळ ओलसर राहातो. भाज्या धुणे, भांडी धुणे, स्वयंपाक करताना खरकटे हात धुणे अशी अनेक कामं तिथे केली जातात. त्यामुळे तिथे नेहमीच वेगवेगळ्या अन्नपदार्थांचे कण साठलेले दिसतात. कधी कधी तर हे कण किचन सिंकच्या पाईपमध्ये अडकून बसतात. तिथे ते कुजतात, सडतात आणि त्यांचा दुर्गंध यायला लागतो. कधी कधी ही दुर्गंधी एवढी वाढते की त्यामुळे सगळ्या स्वयंपाक घरातच वास पसरतो (3 Remedies to Get Rid of Bad Smell or Odour From Sink). म्हणूनच पुढे सांगितलेले उपाय नियमितपणे करा जेणेकरून सिंकमधून दुर्गंधी येणार नाही.(how to clean kitchen sink?)
सिंकमधून घाण वास येत असेल तर काय करावे?
१. सगळ्यात पाहिला उपाय म्हणजे ३ ते ४ लीटर पाणी गॅसवर चांगलं कडक करून घ्या. या पाण्यामध्ये १ ते २ चमचे डिशवाॅश लिक्विड घालून त्याचा फेस तयार करा. आता हे पाणी सिंकमध्ये ओता. दर २ ते ३ दिवसांनी एकदा रात्री झोपण्यापुर्वी हा उपाय करा. सिंकमधली घाण हळूहळू स्वच्छ होईल.
रोज 'या' पद्धतीने विड्याचं पान खा- तब्येतीच्या कित्येक तक्रारी कमी होऊन सौंदर्यही खुलेल
२. व्हिनेगर, बेकिंग सोडा आणि डिशवॉश लिक्विड या तिन्ही गोष्टी एकत्र करून त्यांचे साधारण १ ग्लास एवढे मिश्रण तयार करा. सगळ्यात आधी हे मिश्रण सिंकमध्ये टाका. त्यानंतर ५ ते ७ मिनिटांनी त्यावर २ ते ३ ग्लास कडक पाणी ओता. हा उपाय काही दिवस दररोज करा. घाण वास कमी होईल. त्यानंतरही आठवड्यातून एकदा हा उपाय करत राहा. जेणेकरून सिंकचा पाईप स्वच्छ राहील.
३. किचन सिंकमधून घाण वास येऊ नये यासाठी ते नेहमी स्वच्छ ठेवणंही गरजेचं आहे. सिंकमध्ये खरकटी भांडी खूप जास्त वेळ ठेवू नका. तसेच सिंकच्या जाळीमध्ये अडकलेले खरकटे कण लगेचच्या लगेच स्वच्छ करा.
घरच्याघरीच तयार करा मल्टीग्रेन आटा! विकतचं पीठ आणायची गरजच नाही, घ्या सोपी रेसिपी
४. सिंकमध्ये कधीही तेल टाकू नका. तसेच पातळ खरकटे पदार्थही टाकू नका. ते भरपूर पाणी टाकून आधी डायल्यूट करा आणि मगच सिंकमध्ये टाका.