Get rid of lizards : पावसाळ्यात अनेक घरांमध्ये पाली पाहुण्यांसारख्या फिरत असतात. ज्या घरात कुणालाही नको असतात. पाल बघितली की अनेकजण किंचाळतात, भिती वाटते. पाल बाहेर काढायची म्हटली तरी अनेकजण पळून जातात. अशात या पालींच्या जवळ न जाता कशा घराबाहेर काढायच्या यावर काही सोपे उपाय असतात जे अनेकांना माहीत नसतात.
अनेकांना हेही माहीत नसतं की, घरातच असलेल्या काही गोष्टींच्या मदतीनं आपण घरात फिरणाऱ्या पाली आणि त्यांची पिलावळं बाहेर काढू शकतो. महत्वाची बाब म्हणजे हे उपाय नॅचरल असतात. एका पांढऱ्या पावडरच्या मदतीने आपण घरातील पाली बाहेर काढू शकतो.
पहिला उपाय
कापराच्या 4 वड्या, 10 ते 15ml डेटॉल, 150ml पाणी, एक स्प्रे बॉटल घ्या. हा उपाय पालींना पळवून लावण्यासाठी सगळ्यात बेस्ट मानला जातो. तसेच यासाठी आपल्याला खर्चही कमी करावा लागतो. कापराच्या वडीची पांढरी पावडर जेव्हा डेटॉल आणि पाण्यात मिक्स केली जाते तेव्हा एक प्रभावी औषध तयार होतं. पाली पळवण्यासाठी हा उपाय बेस्ट ठरतो. हे मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये टाका आणि पाली येत असलेल्या ठिकाणी शिंपडा.
दुसरा उपाय
एक कांदा घ्या, 5 ते 6 लसणाच्या कळ्या घ्या, 150ml पाणी घ्या. या गोष्टींचं मिश्रणही पाली पळवण्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. हे तयार करण्यासाठी कांदा कापा आणि लसणाच्या कळ्या सोलून घ्या. दोन्ही गोष्टी बारीक करून त्यातील रस काढा. आता हे मिश्रण अशा ठिकाणांवर स्प्रे करा जिथे पाली येतात.
कांदा आणि लसणाचा गंध पालींना दूर पळवण्यासाठी खूप फायदेशीर ठरतो. लसणामध्ये सल्फर तत्व असतं जे पालींना अजिबात पसंत नसतं. तेच कापराचा गंध सुद्धा पालींना सहन होत नाही. त्यामुळे पाली घरातून पळून जातात.