Join us

वडिलांचे निधन, आई सोडून गेली, १० वर्षाचे लेकरू विकतेय रोट्या..काय यावे वाट्याला त्याच्या..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2024 12:02 IST

10-year-old Delhi boy sells rolls after father's death, video goes viral : व्हायरल व्हिडीओ पाहून प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी दिला मदतीचा हात..

परिस्थिती सगळं काही शिकवते. असे म्हणतात (Viral Video). याचा प्रत्येय आपल्याला वारंवार येतो. काही मुलांच्या खांद्यावर लहानपाणीच जबाबदारी पडते. ज्यामुळे मिळेल ते काम करून पोट भरतात. शिवाय घरातही हातभार लावतात. अशाच एका कोवळ्या वयात खांद्यावर जबाबदारी पडलेल्या मुलाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा चिमुकला दिल्लीतील (Delhi) टिळक नगर भागात रोल विकतो.

मुख्य म्हणजे वडिलांचे निधन झाल्यानंतर, त्याने रोल मेकिंग करून पोट भरण्याचं ठरवलं असल्याचं तो म्हणतो. सध्या हा व्हिडिओ व्हायरल झाला असून, हा व्हिडिओ प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनीही शेअर केला आहे(10-year-old Delhi boy sells rolls after father's death, video goes viral).

वडिलांचे झाले निधन, आई गेली सोडून..

उपाशीपोटी ३० मिनिटं रोज करा मॉर्निंग वॉक, ४ बदल - आयुष्यभरासाठी तब्येतीची तक्रारच संपेल

व्हायरल व्हिडिओमध्ये १० वर्षीय मुलगा रोल करताना दिसत आहे. व्हिडिओ शूट करणारा व्यक्ती, त्याला रोल तयार करायला कुठून शिकला असे विचारतो. तेव्हा तो 'आपल्या वडिलांकडून शिकलो' असल्याचं म्हणतो. तेव्हा तो व्यक्ती, 'वडील रोल मेकिंग करयला येत नाही का?' असे विचारतो. तेव्हा चिमुकला, 'वडिलांचे ब्रेन टीबीमुळे निधन झाल्याचं तो सांगतो. शिवाय आई तिच्या माहेरी सोडून निघून गेल्याचंही तो सांगतो. सध्या चिमुकला आणि त्याची १४ वर्षीय बहिण त्यांच्या काकांकडे राहतात. ही गोष्ट ऐकून नक्कीच अनेकांच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही.

महिंद्रांची मोठी घोषणा

'तुझी फिगर कर्व्ही..' सोनाली बेंद्रेने सांगितला बॉडी शेमिंगचा भयंकर अनुभव

हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की, त्याची दाखल उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही घेतली. त्यांनी व्हिडिओवर व्यक्त होत, चिमुकल्याच्या कष्टाचे कौतुक केले आहे. त्यांनी व्हिडिओ शेअर करत म्हटले की, 'चिमुकल्याची नाव जसप्रीत असे आहे. तो दिल्लीतील टिळक नगर येथे राहतो. जर कोणी या मुलाला ओळखत असेल तर कृपया आमच्याशी संपर्क साधा. आम्ही त्याला त्याच्या शिक्षणासाठी कशी मदत करू शकतो याबद्दल महिंद्रा फाउंडेशनची टीम कार्य करेल.'

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी मदतीचा प्रस्ताव दिल्यानंतर सोशल मीडियावर त्यांचे खूप कौतुक होत आहे. शिवाय काही नेटकऱ्यांनी योग्य मदत मिळाल्यास या मुलाचे भविष्य उज्ज्वल होईल असे म्हटले आहे.

टॅग्स :आनंद महिंद्रासोशल व्हायरलसोशल मीडियादिल्ली