lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > नवरात्रात तांब्याची भांडी चकचकीत करायची? १ सोपा उपाय, भांडी चमकतील नव्यासारखी…

नवरात्रात तांब्याची भांडी चकचकीत करायची? १ सोपा उपाय, भांडी चमकतील नव्यासारखी…

1 Easy Trick to Clean Copper utensils for Navratri : घरच्या घरी काही सोपे उपाय केल्यस तांब्याची काळपट झालेली भांडी लख्ख होण्यास मदत होते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2023 06:37 PM2023-10-15T18:37:52+5:302023-10-15T18:44:03+5:30

1 Easy Trick to Clean Copper utensils for Navratri : घरच्या घरी काही सोपे उपाय केल्यस तांब्याची काळपट झालेली भांडी लख्ख होण्यास मदत होते.

1 Easy Trick to Clean Copper utensils for Navratri : Should copper pots be polished during Navratri? 1 simple solution, dishes will shine like new… | नवरात्रात तांब्याची भांडी चकचकीत करायची? १ सोपा उपाय, भांडी चमकतील नव्यासारखी…

नवरात्रात तांब्याची भांडी चकचकीत करायची? १ सोपा उपाय, भांडी चमकतील नव्यासारखी…

नवरात्रोत्सव सुरु झाला आहे आणि आपण सगळेच देवीची पूजाअर्चा करत आहोत. घरोघरी घट बसत असल्याने महाराष्ट्रासोबतच महाराष्ट्राच्या बाहेरही हा सोहळा अतिशय उत्साहात साजरा केला जातो. देवाच्या कार्यासाठी आपण चांदी, तांबे, पितळ यांची भांडी प्रामुख्याने वापरतो. यामध्ये कलश, ताम्हण, पळी, भांडे, दिवे यांसारख्या गोष्टींचा समावेश असतो. प्रामुख्याने तांब्याची भांडी जास्त प्रमाणात वापरली जातात. तांब्याची भांडी दिसायला छान दिसत असतील तरी त्यावर एकदा पाण्याने किंवा हवेनेही काळे डाग पडले की या भांड्यांची मजा जाते (1 Easy Trick to Clean Copper utensils for Navratri). 

मात्र ती एकदा घासली की मस्त लख्ख-चकचकीत दिसतात आणि नकळत आपल्याला प्रसन्न वाटते. हे काळे डाग घासून काढणे हे एक मोठे काम असते, बाजारात मिळणाऱ्या विविध पावडरींचा वापर करुन आपण हे डाग काढण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्यामुळे एकतर आपले हात केमिकल्समुळे खराब होण्याची शक्यता असते. तसेच या पावडरी महाग असतात. त्यापेक्षा घरच्या घरी काही सोपे उपाय केल्यस तांब्याची काळपट झालेली भांडी लख्ख होण्यास मदत होते. पाहूयात तांब्याच्या भांड्यावरचे डाग काढण्याची सोपी पद्धत...

(Image : Google )
(Image : Google )

१. एका बाऊलमध्ये साधारण ३ चमचे डाळीचे पीठ घ्यायचे. 

२. यामध्ये १ चमचा मीठ घालून ते चांगले एकत्र करायचे. 

३. यात ३ चमचे दुधाचे दही घालायचे. 

४. साधारण १ चमचा हळद आणि २ चमचे लिंबाचा रस घालायचा. 

५. हे सगळे चांगले फेटून त्याची पेस्ट होईपर्यंत एकजीव करायचे. 

६. ही पेस्ट घेऊन तांब्याच्या भांड्यांवर हाताने लावायची. 

७. एखादा सुती कपडा किंवा मऊ ब्रशने ही पेस्ट भांड्यावर सगळीकडे चोळायची. 

८. एखाद्या मऊ कापडाने ही पेस्ट स्वच्छ पुसून घ्यायची.

९. तांब्याचे काळे दिसणारे भांडे एकाएकी चमकताना दिसते. 

१०. घरच्या घरी करता येईल असा हा उपाय अतिशय सोपा असून तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी आपण हा उपाय नक्कीच वापरु शकतो.  


 

Web Title: 1 Easy Trick to Clean Copper utensils for Navratri : Should copper pots be polished during Navratri? 1 simple solution, dishes will shine like new…

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.