रोजचा स्वयंपाक करण्यासाठी कांदा, लसूण आणि वेगवेगळ्या मसाल्यांचा हमखास वापर होतोच. स्वयंपाक घरात आपण कांदा चिरणे, लसूण सोलणे, मसाला वाटणे अशी अनेक काम (Hand Odor Remover Stainless Steel Soap Bar) अगदी रोजच करत असतो. परंतु अनेकदा कांदा, लसूण, मसाल्यांचे हातांना येणारे उग्र वास काही केल्या जात नाहीत. हातांना येणारे हे उग्र वास घालवण्यासाठी आपण कित्येकदा साबणाने हात देखील अगदी स्वच्छ धुतो, परंतु हातांना येणारे उग्र वास सहजासहजी निघत नाहीत. हातांना सतत येणाऱ्या त्या कांदा - लसणाच्या उग्र वासाने काहीवेळा नकोसे वाटते(How To Use Hand Odor Remover Stainless Steel Soap Bar).
आपण कितीहीवेळा सुवासिक साबण, लिक्विड हँडवॉशने हात धुतले तरी काहीच उपयोग होत नाही. पण आता यावर एक ठोस आणि सोपा उपाय म्हणजे स्टीलचा साबण! होय, स्टीलचा साबण... हा खास स्टेनलेस स्टीलपासून बनवलेला साबण तुम्ही विकत घेऊ शकता आणि तो कधीही संपत नाही. फक्त पाण्याने हात धुताना त्याचा वापर करा (Stainless steel odor remover Soap Bar for kitchen use) आणि कांदा-लसूण-मसाल्याचे सगळे वास जादूसारखे क्षणांत गायब होतील! हातांना येणारा उग्र वास घालवण्यासाठी या स्टीलच्या साबणाबद्दल अधिक सविस्तर माहिती घेऊयात.
हातांना येणारा उग्र वास घालवणारा स्टीलचा साबण...
स्टीलचा साबण पाहताना तो फक्त एक स्टीलच्या धातूचा तुकडा वाटतो, पण त्यामागे एक वैज्ञानिक कारण दडलेलं आहे. कांदा, लसूण, मसाले यांमध्ये सल्फरयुक्त संयुगे (Sulfur Compounds) असतात, जे आपल्या त्वचेवर चिकटून बसतात आणि त्यामुळे हातांना उग्र वास येतो. स्टीलचा साबण वापरताना जेव्हा आपण तो पाण्याच्या संपर्कात आणता, तेव्हा स्टील आणि पाण्यातील अणूंच्या क्रियेमुळे एक प्रकारची ऑक्सिडेशन रिअॅक्शन होते. या रासायनिक प्रक्रियेमुळे सल्फरयुक्त रेणू तुटतात आणि त्यांचा वास नाहीसा होतो.
कढई - तव्याच्या कडेला साचला काळाकुट्ट थर? १ भन्नाट ट्रिक - न घासताच होईल मिनिटांत चकाचक...
सोप्प्या भाषेत सांगायचं झालं, तर स्टीलचा साबण सल्फरचे अणू निष्क्रिय करतो आणि त्यामुळे हातांवरचा कांदा, लसूण आणि इतर मसाल्यांचा वास पूर्णपणे नाहीसा होतो आणि विशेष म्हणजे हा साबण कधीच संपत नाही! आता गृहिणींना कांदा, लसूण सोलल्यानंतर त्याचा हातांवरील वास घालवण्यासाठी अनेकदा हात धुण्याची झंझटच करावी लागणार नाही, तर एकदा धुतल्यानेच हातांवरील दुर्गंध नाहीसा होईल. हा स्टीलचा साबण म्हणजे नैसर्गिक, टिकाऊ आणि कायमस्वरूपी उपाय - एकदा घ्या आणि वर्षानुवर्षे वापरा!
याचा वापर कसा करायचा ?
आपण नेहमीच्याच साबणाप्रमाणेच याचा वापर करु शकतो. पाण्याने हात ओले करून मग हा साबण हळूवारपणे हातांवर चोळून घ्या. मग पाण्याने हात स्वच्छ धुवून घ्यावेत. या उपायामुळे, हातांना येणारा कांदा, लसूण, मसाल्यांचा उग्र वास मिनिटांत गायब होतो.
पेस्ट कंट्रोल करुनही ढेकूण जात नाहीत? खिशाला परवडेल असा जालीम उपाय - ढेकूण परत होणारच नाही!
किंमत आणि रेटिंग...
हा 'स्टीलचा साबण' आपल्याला ऑनलाईन शॉपिंग साईटवर अगदी सहजपणे विकत घेता येऊ शकतो. या 'स्टीलच्या साबणाला' ला ३.४ स्टार इतके रेटिंग देण्यांत आले आहे, तर आत्तापर्यंत ५० पेक्षा अधिक लोकांनी हा 'स्टीलचा साबण' विकत घेतला आहे. या 'स्टीलच्या साबणाची' किंमत ४९४ रुपये इतकी आहे. असा हा 'स्टीलचा साबण' खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा https://amzn.to/46P9eYQ